छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस आहे. किल्ले शिवनेरीवर आज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती शासकीय पद्धतीने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. सह्याद्रीच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याला लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती. याचपार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे शिवनेरी गडावर कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा- Chhatrapati Shivajimaharaj Jayanati 2026 : शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह; मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवजन्मोस्तव साजरा
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज पहिल्यांदा शिवनेरीवर बोलताना पाहायला दिसल्या. शिवनेरीवरुन दादांची आठवण सांगताना डोळे भरून आले, तसेच कंठ दाटून आला असतानाही धीरानं अश्रू ढळू न देता त्यांनी स्वत:ला धीरानं सावरलं आणि त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवलं. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचंही दिसून आलं.