Wednesday, June 18, 2025 02:39:10 PM

पाकिस्तानात गेलेल्या नागपुरमधील सुनीता जामदाडे न्यायालयात हजर

गद्दार सुनीता पाकिस्तानातील तीन लोकांच्या संपर्कात होती. हे तिघे पाकिस्तानी नागरिक आहेत की गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट? याचा तपास नागपूर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे.

पाकिस्तानात गेलेल्या नागपुरमधील सुनीता जामदाडे न्यायालयात हजर

तेजस मोहातुरे, प्रतिनिधी, नागपूर: भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली गद्दार सुनीता जमदाडे नावाची महिला पाकिस्तानातील तीन लोकांच्या संपर्कात होती. गद्दार सुनीता इंस्टाग्रामच्या माध्यमातून ज्या तीन लोकांच्या संपर्कात होती, त्या तिघांना भेटण्यासाठी ती पाकिस्तानला गेली होती, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली. हे तिघे पाकिस्तानी नागरिक आहेत की गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट? याचा तपास नागपूर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे.

पोलीसांनी गद्दार सुनीताचा इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटची सखोल पाहणी केली असून, इन्स्टाग्रामवरून ती पाकिस्तानी जुल्फेकर, असद आणि तौफिकच्या सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी शासकीय गुप्त अधिनियमांसह विविध कलमान्वये सुनीतावर गुन्हा दाखल करून गुरुवारी तिला अटक केली होती. तसेच, 2 जूनपर्यंत सुनीताची पोलीस कोठडी घेतली होती. दरम्यान, 2 जून रोजी सुनीताला न्यायालयात हजर करणार आहे.

आरोपी रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार?

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माला ३० मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. अशातच, रवी वर्मा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या रवी वर्माची 2 जून रोजी पोलीस कोठडी संपणार आहे. तसेच, सोमवारी ठाणे न्यायालयात एटीएसची (ATS) टीम आरोपी रवी वर्माला हजर करणार आहे.


सम्बन्धित सामग्री