इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळला. या दुर्घटनेची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून त्यांनी एक्स पोस्ट केली आहे.   

इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळला. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अंदाजे 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रविवार असल्यानं मोठ्या संख्येने पर्यटक कुंडमळ्यात उपस्थित होते. पर्यटक पुलावर उभे असताना हा अपघात झाला आहे.  या दुर्घटनेची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून त्यांनी एक्स पोस्ट केली आहे.   
पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. अद्याप किती जण बुडाले आहेत. हे स्पष्ट होऊ शकलं नाही, अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कुंडमळ्यातील पूल कोसळल्यानंतर काही जण वाहून गेले. त्यानंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु आहे. 

हेही वाचा : Indrayani River Bridge Collapse: मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला; मोठी जीवितहानी

इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची एक्स पोस्ट
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती आहे.
ही घटना अतिशय दुर्दैवी असून, नागरिक सुरक्षित असावे ही प्रार्थना. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून, आवश्यक ती सर्व मदत ते पाठवत आहेत. नागरिकांना विनंती आहे की आवश्यक ती काळजी घ्यावी. पावसाळी पर्यटनासाठी जाताना सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number