Sushma Andhare On Operation Tiger : ‘त्यांना वाटतं ते सगळ्यात मोठे तीसमार खान,…आम्ही सगळं समजून उमजून आहोत’; सुषमा अंधारेंचा घणाघात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार अचानक दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या बंडामागे वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर असल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा […]

Sushma Andhare On Operation Tiger : ‘त्यांना वाटतं ते सगळ्यात मोठे तीसमार खान,…आम्ही सगळं समजून उमजून आहोत’; सुषमा अंधारेंचा घणाघात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार अचानक दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या बंडामागे वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर असल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट दोन खासदारांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण मोहिमेचे कॅप्टन खासदार संजय देशमुख असून वाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर आहेत. पक्षात सुरू असलेल्या या हालचालींमध्ये या दोघांची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : Shivsena UBT MP’s PC : ‘तुम्हाला जायचं असेल तर राजीनामा द्या, मागच्या वेळेची पुनरावृत्ती झाली तर…’; ठाकरेंच्या निष्ठावंत खासदारांनी बंड करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

ठाकरे गटाचे खासदार परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे हे दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील पत्र सादर करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदारांनी वेगळा निर्णय घेतल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार आवश्यक असलेले दोन-तृतीयांश संख्याबळ पूर्ण होते आणि स्वतंत्र गट स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

सुषमा अंधारे यांनी नमूद केले की, “नागेश पाटील आष्टीकर हे ठरवून सगळ्यांना वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटते की ते सगळ्यात मोठे तीसमार खान आहेत. पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या आणि संजय देशमुख यांच्या चाललेल्या जेवणावेळी अगदी परवाच्या रात्री ओव्हरस्मार्ट बनत त्यांनी मला आणि पक्ष नेतृत्वाला केलेला कॉल हे सगळं आम्ही समजून उमजून आहोत.  या सगळ्या कॅम्पेनचे कॅप्टन संजय देशमुख तर वाईस कॅप्टन नागेश आष्टीकर आहेत.” 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number