अमरावती शिक्षण विभाग मतदारसंघात पुणे पॅटर्न राबवणार? शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता; उमेदवारीवरून भाजपमध्ये सस्पेन्स कायम

अमरावती शिक्षक मतदारसंघातून भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

अमरावती शिक्षण विभाग मतदारसंघात पुणे पॅटर्न राबवणार? शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता; उमेदवारीवरून भाजपमध्ये सस्पेन्स कायम
sangeeta shinde, shekhar bhoyar, aditi pohare

सुरेंद्र अकोडे, प्रतिनिधी 

अमरावती : अमरावती शिक्षक मतदारसंघातून भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून शेखर भोयर आणि संगीता शिंदे (खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी) यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. अमरावती शिक्षण विभाग मतदारसंघात पुणे पॅटर्न राबवणार का? अशीदेखील चर्चा होत आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप पक्षात अधिकृत स्पष्टता अद्याप आलेली नसली तरी, शेखर भोयर हे आज दोन नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एक भाजपचा उमेदवार म्हणून आणि दुसरा अपक्ष अर्ज दाखल होऊ शकतो.

हेही वाचा : ‘पश्चिमेचा कटप्पा’ कोण? सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण; नेमकं प्रकरण काय?

उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचा उमेदवार – 

ठाकरे गटाने बुलढाणा येथील दत्तात्रय लहाने यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा खासदार अरविंद सावंत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

शिंदे गटाची भूमिका आणि विद्यमान आमदार – 

विद्यमान आमदार किरण सरनाईक हे देखील आपला नामांकन अर्ज शिवसेना (शिंदे गट) कडून दाखल करणार आहेत. 2020 च्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. मात्र आता त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने महायुतीकडून ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

प्रा. अदिती पोहरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचा मेळावा

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती पोहरे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिक्षक बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे उपस्थित होते. मी निवडून आले तर जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत माझे आमदारांचे मानधन मी घेणार नाही, असा निर्धार देखील त्यांनी केला. जुन्या पेन्शनच्या मुद्द्याला आधी प्राधान्य असेल. कारण शिक्षकांचे बरेच मुद्दे रेंगाळत चालले आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या, मागण्या आहेत, अशी देखील प्रतिक्रिया अदिती पोहरे यांनी दिली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number