Sunday, July 13, 2025 09:43:02 AM

तटकरे कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली; महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

यगडात आता महायुतीत वाद पाहायला मिळत आहे. तटकरे कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली असा गंभीर आरोप शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

तटकरे कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

रायगड: रायगडात आता महायुतीत वाद पाहायला मिळत आहे. तटकरे कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली असा गंभीर आरोप शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद टोकाला गेला आहे. 

रायगड जिल्ह्यात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादीतील समोर आला आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आता थेट तटकरे कुटुंबांवर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच आदिती तटकरे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा मागितला असल्याने आता तटकरे विरूद्ध शिवसेना यांच्यामध्ये नवीन वॉर पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील दुरटोली गावाजवळ एका सरकारी जमिनीवर आधी शेतकऱ्यांचे नाव लावले त्यानंतर ती जमीन तटकरे यांनी विकत घेतली असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे तर याच मुद्यावरून त्यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. 

हेही वाचा : Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा

शिवसेना तटकरेंच्या विरोधात अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. तटकरे कुटुंबावर त्यांनी हे आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन त्यांनी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी दिला आहे. 

'तटकरेंचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणणार' 
तटकरेंचा खरा चेहरा आता मी महाराष्ट्रासमोर आणणार असा घणाघात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्या विरोधात केला आहे. अलिबाग येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीत दळवी यांनी तटकरेंवर तोफ डागली. जेव्हा तटकरेंना मोठ पद हव असतं, एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेव्हा तटकरे महाराजांचा आधार घेतात. भैयुजी महाराजांचे नाव घेत गंभीर आरोप  केला. याचे अधिकृत कॅसेट आपल्याकडे असल्याचे देखील दळवी म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री