Sandeep Deshpande: ‘मासे खाऊ नका हे सांगणं हा सांस्कृतिक दहशतवादच…’; जैन मुनींच्या इशाऱ्यावर संदीप देशपांडेंचा संताप

जैन मुनींच्या विधानाचा समाचार घेताना संदीप देशपांडे म्हणाले की, धर्माच्या नावाखाली लोकांनी काय करावे आणि काय करू नये, हे सांगणे जैन मुनींना शोभत नाही.

Sandeep Deshpande: ‘मासे खाऊ नका हे सांगणं हा सांस्कृतिक दहशतवादच…’; जैन मुनींच्या इशाऱ्यावर संदीप देशपांडेंचा संताप

Sandeep Deshpande: मुंबईतील दादर आणि घाटकोपर भागातील रस्त्यांवर जैन धर्मगुरूंसाठी ओढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आता कमालीचा पेटला आहे. मनसेने या प्रकाराला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ असे संबोधत तीव्र विरोध दर्शवला होता, ज्याची दखल घेत मुंबई महापालिकेने (BMC) त्या पट्ट्या तात्काळ पुसून टाकल्या. या कारवाईनंतर जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांना थेट इशारा दिला होता. आता या इशाऱ्याला देशपांडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले असून या वादाने नवे वळण घेतले आहे.  

‘मासे, चिकन खाऊ नका सांगणे हाच सांस्कृतिक दहशतवाद’

जैन मुनींच्या विधानाचा समाचार घेताना संदीप देशपांडे म्हणाले की, “धर्माच्या नावाखाली लोकांनी काय करावे आणि काय करू नये, हे सांगणे जैन मुनींना शोभत नाही. ‘मी मासे खात नाही, म्हणून माझ्या घरासमोर मच्छी मार्केट नको, तुम्ही चिकन-मासे खाऊ नका’ असे लोकांवर जबरदस्तीने लादणे, हाच खरा सांस्कृतिक दहशतवाद आहे. मराठी माणूस मांसाहार करतो म्हणून त्याला घरे नाकारली जातात, हा अन्याय आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, प्रत्येकाने आपले फुकटचे सल्ले स्वतःपाशीच ठेवावेत.

हेही वाचा – Uddhav Thackeray MP Meeting Matoshree : मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

मुनींच्या वक्तव्यावरून महिलांच्या मानसिकतेवर बोट

जैन मुनींनी वापरलेल्या एका वाक्प्रचारावर आक्षेप घेत देशपांडे यांनी त्यांच्या मानसिकतेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कोणतातरी चंद्रावर राहणारा मुनी म्हणतोय की ‘आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत.’ या विधानावरूनच त्यांची महिलांविषयीची तुच्छ मानसिकता स्पष्ट होते. महिलांना कमजोर समजण्याची प्रवृत्ती त्यांच्यात दिसून येते, कारण त्यांच्या परंपरेत रणरागिणींचा इतिहास नसेल. परंतु, मराठी माणसाचा इतिहास वेगळा आहे. आमच्याकडे राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी यांसारख्या वीर महिलांचा प्रदीर्घ इतिहास आहे. त्यामुळे महिलांना दुय्यम दर्जा देणे हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.”

भोंग्यांचा जो नियम, तोच पांढऱ्या पट्ट्यांचा; देशपांडेंची ठाम भूमिका

आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना संदीप देशपांडे यांनी मनसेच्या जुन्या आंदोलनाचा दाखला दिला. ते म्हणाले, “आम्ही जी भूमिका मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या बाबतीत घेतली होती, तीच भूमिका रस्त्यावरील या पांढऱ्या पट्ट्यांच्या बाबतीतही आहे. कोणाचाही धर्म हा रस्त्यावर येता कामा नये, तर तो चार भिंतींच्या आतच पाळला गेला पाहिजे. सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे धार्मिक मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number