BJP vs Shivsena Politics: ठाण्यात भाजप आणि शिंदे गटात तुंबळ हाणामारी; ‘या’ कारणावरून झाला हा वाद

बीएसयूपी घरांच्या जल्लोष कार्यक्रमादरम्यान हा वाद बळावला. अलीकडील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

BJP vs Shivsena Politics:  ठाण्यात भाजप आणि शिंदे गटात तुंबळ हाणामारी; ‘या’ कारणावरून झाला हा वाद

ठाणे: राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील तणावाचं वातावरण वाढत असतानाच ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणखी एक वाद उफाळून आला आहे. या वादात शिवसेना शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याची तक्रार समोर आली आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख हरेश महाडीक आणि उपविभागप्रमुख महेश लहाने यांना भाजपचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी रात्री घडली असून पोलिसांनी याबाबत एनसी नोंदवली आहे.

अलीकडेच शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येत असल्याचा आणि शिंदे गटातील अनेक माजी नगरसेवक फोडण्यात आल्याचा आरोपही शिंदेंनी शाहांसमोर मांडल्याचे समजते.

हेही वाचा: Parth Pawar Land Scam : "पार्थ पवारला अडकवण्यामागे तटकरे", शिवसेना आमदाराचा मोठा दावा

ठाण्यातील बीएसयूपी घरांसाठी शंभर रुपयांच्या रजिस्ट्रेशन फीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाल्याने शिवसैनिकांनी विविध बीएसयूपी इमारतींमध्ये जल्लोषाचे कार्यक्रम आयोजित केले. पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण इमारतीतही असा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

मात्र, या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार अचानक पोहोचले आणि हा जल्लोष का केला जात आहे, असा प्रश्न विचारला. त्यानंतर वाद वाढत गेला आणि पवार यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप समोर आला. पवार यांच्या प्रतिक्रिया मिळाल्या नसल्या तरी घटनांमुळे दोन्ही पक्षांतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील ताज्या मारहाणीच्या घटनेनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा: Malegaon Crime Case : "न्याय द्या अन्यथा रस्त्यावर उतरू" मनोज जरांगे पाटीलांचा सरकारला अल्टिमेटम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number