Thane Water Cut: ठाण्यात पाणीटंचाईचे सावट; 24 तास ‘या’ भागांचा पाणीपुरवठा बंद, महापालिकेने जाहीर केली यादी

ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये 1 जुलै रोजी 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने महापालिकेने नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन केले आहे.

Thane Water Cut: ठाण्यात पाणीटंचाईचे सावट; 24 तास  ‘या’ भागांचा पाणीपुरवठा बंद, महापालिकेने जाहीर केली यादी

ठाणे शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

यंदा राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने धरणांमधील जलसाठा कमी होत आहे. हवामान तज्ज्ञांनी यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या कळवा पाटबंधारे विभागाने स्टेम प्राधिकरणाला 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बुधवार, 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवार, 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत स्टेमकडून ठाण्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Deputy Chairman : विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक जाहीर; शिंदे सेनेतील या नेत्यांमध्ये मोठी चुरस

मात्र, ठाणे महापालिकेने स्वतःच्या जलयोजनेचे नियोजन करून शहरात किमान एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये सकाळी तर काही भागांमध्ये रात्री पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, रेतीबंदर तसेच मुंब्रा परिसरातील काही भागांमध्ये बुधवार सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रुस्तमजी, दोस्ती, आकृती, वर्तकनगर (म्हाडा) या भागांमध्ये बुधवार रात्री ९ ते गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number