Sambhajinagar Crime : शिक्षणासाठी मामाच्या घरी आलेल्या भाच्यासोबत मामीचं नको ते कृत्य; मामाने दोघांना रंगेहात पकडले अन्…

शिक्षण घेण्यासाठी मामाच्या आश्रयाला आलेल्या 19 वर्षीय भाच्याचे त्याच्या मामीने शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sambhajinagar Crime : शिक्षणासाठी मामाच्या घरी आलेल्या भाच्यासोबत मामीचं नको ते कृत्य; मामाने दोघांना रंगेहात पकडले अन्…

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षण घेण्यासाठी मामाच्या आश्रयाला आलेल्या 19 वर्षीय भाच्याचे त्याच्या मामीने शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी मामीचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

नेमकी घटना काय?

प्राप्त माहितीनुसार, आईच्या निधनानंतर पीडित मुलगा शिक्षणासाठी आपल्या मामाकडे राहायला आला होता. मात्र, तिथेच त्याच्या छळाला सुरुवात झाली. तक्रारीनुसार, मार्च 2023 पासून आरोपी मामीने त्याला घरातून हाकलून देण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मामा कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर ही महिला भाच्याला बेडरूममध्ये बोलावून जबरदस्ती करत असे. कोणाला काही सांगितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन ती त्याला सातत्याने ब्लॅकमेल करत होती.

हेही वाचा – Crime News : आधी पतीला मारलं, आता तिचंही आयुष्य संपवलं; न्यायासाठी लढणाऱ्या महिलेला भररस्त्यात गोळ्या घातल्या

असा उघड झाला प्रकार

दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये हा घृणास्पद प्रकार मामाच्या निदर्शनास आला. त्यांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडल्याने सर्व पितळ उघडे पडले. या घटनेनंतर पीडित मुलगा आपल्या वडिलांकडे निघून गेला होता. दरम्यान, संबंधित आरोपी महिला जुलै 2024 मध्ये दुसऱ्या एका व्यक्तीसोबत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Gulshan Kumar’s Shooter Dies : गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू; अंडरवर्ल्डच्या सांगण्यावरून झाडल्या होत्या 16 गोळ्या

न्यायालयीन कारवाई

या गंभीर प्रकरणाचा तपास पूर्ण करून चिकलठाणा पोलिसांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केले आहे. आरोपी महिलेने अटकेपासून वाचण्यासाठी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number