सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती
९८१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यापासून वेगळा झालेला सिंधुदुर्ग आज राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीयदृष्ट्या कोकणातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. या जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषद जागा ,50 पैकी 8 बिनविरोध असणार असून 42 जगासाठी 115 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तसेच पंचायत समितीच्या एकूण 100 जागांमध्ये 17 जागा बिनविरोध तर उर्वरित 83 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
महायुती विरुद्ध ठाकरे शिवसेना अशा मुख्य लढती पाहायला मिळणार आहेत:
महायुती (भाजप शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी)
महा विकास आघाडी (ठाकरे शिवसेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी)
26 मतदार संघात दुरंगी
12 मतदारसंघात तिरंगी
1 मतदारसंघात चौरंगी
3 मतदार संघात पंचरंगी अशा लढती आहेत.
28 अपक्ष उमेदवार रिंगणात
सध्याचे मतदार 5 लाख 61 हजार 105 आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (एकूण जागा – 50)
काँग्रेस - 27
शिवसेना - 16
भाजप- 6
राष्ट्रवादी - 1
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आव्हानं काय?
२०१७ नंतर तब्बल ९ वर्षांनी ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या ५० आणि आठ पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी आज 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन पेचप्रसंगामुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परिणामी गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात होता. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही प्रक्रियेला नवसंजीवनी मिळणार आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार, पर्यटनाला चालना, आरोग्य सुविधा हॉस्पिटल प्रश्न, येथील उत्पादित साधन संपत्ती व आंबा, काजू फलोत्पादन यावर प्रक्रिया उद्योग अशी आव्हानं असणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख लढती:
- नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप कडून संदेश सावंत यांच्या विरोधात ठाकरे सेनेचे उत्तम लोके निवडणुकीच्या रिंगणात.
- फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे सेनेचे सदानंद उर्फ बबन हळदिवे यांच्या विरोधात राजन चिके यांनी भाजप मधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर अनंत पिळणकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून निवडणुकीच्या रिंगणात असल्याने तिहेरी लढत.
- हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसघात भाजप कडून मनोज रावराणे यांच्या विरोधात शिंदे सेनेकडून बंडखोरी करत अपक्ष प्रमोद सांगवेकर निवडणुकीच्या रिंगणात.
- नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे सेनेचे संजय पडते यांच्या विरोधात भाजप मधून बंडखोरी करत अपक्ष रुपेश पावसकर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत ठाकरे सेनेचे समर्थन मिळाले.
- आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत अपक्ष समिधा नाईक यांना समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्या विरोधात ठाकरे सेनेचे विजय नाईक रिंगणात.
- माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे सेनेचे रुपेश कानडे यांच्या विरोधात ठाकरे सेनेचे रमाकांत ताम्हणेकर रिंगणात.
- माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून रामा गवस यांच्या विरोधात भाजप मधून बंडखोरी करत अपक्ष राजेंद्र म्हापसेकर रिंगणात.
- मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात साक्षी तळवडेकर यांच्या विरोधात भाजप मधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून सुनीता भिसे निवडणुकीच्या रिंगणात.
- तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ यांच्या विरोधात भाजप कडून संदीप गावडे निवडणुकीच्या रिंगणात.
- कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप कडून महेश सारंग यांच्या विरोधात भाजप मधून बंडखोरी करत अपक्ष मायकल डिझोजा निवडणुकीच्या रिंगणात.