Ajit Pawar Plane Crash: ‘कप्तानने ठोक दिया…’; भर पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवून रोहित पवारांचा खळबळजनक दावा

रोहित पवार यांनी या अपघाताचा सविस्तर अहवाल फेटाळून लावत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

Ajit Pawar Plane Crash: ‘कप्तानने ठोक दिया…’; भर पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवून रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर (AAIB) गंभीर आक्षेप नोंदवत खळबळ उडवून दिली आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 'व्हीएसआर' विमान कंपनीच्या विमा विमा प्रतिनिधीसोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप ऐकवली, ज्यामध्ये संबंधित व्यक्ती अपघाताच्या घटनेबद्दल अत्यंत बेजबाबदारपणे बोलताना ऐकू येत आहे.

तपास अहवालावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी या अपघाताचा सविस्तर अहवाल फेटाळून लावत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या दाव्यानुसार, अपघातावेळी विमानाची कार्यक्षमता (Official Life) 3000 तासांपेक्षा जास्त झाली होती आणि दृश्यमानताही अत्यंत कमी होती. अहवालात बारामतीचा उल्लेख चक्क 'जिल्हा' आणि 'महानगरपालिका' असा करण्यात आला आहे, ज्यावरून तपासातील निष्काळजीपणा दिसून येतो. विमानाचा अपघात झाडांना धडकल्यामुळे झाल्याचा दावा अहवालात आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत तिथे केवळ छोटी झुडपं असून विमानाची आणि त्यांची उंची जुळत नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Uddhav And Raj Thackeray: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा दुरावा? राज ठाकरेंच्या तटस्थ भूमिकेने उद्धव ठाकरेंचे वाढले टेन्शन

काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये?
रोहित पवारांनी सादर केलेल्या ऑडिओमध्ये इन्शुरन्स एजंट बारामतीमधील माळी कुटुंबाशी संवाद साधताना म्हणतोय, "कप्तान साहबने ठोक दिया… अब क्या करोगे?" या संभाषणात पायलटने विमान चुकीच्या दिशेला नेल्यामुळे अपघात झाल्याचे तो एजंट सांगत आहे. "अजितदादांच्या अपघातासारखी गंभीर घटना ही विमान कंपनी आणि त्यांचे प्रतिनिधी किती हलक्यात घेत आहेत, हे या ऑडिओवरून स्पष्ट होते. हा अपघात नसून घातपाताचा प्रयत्न आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे," असे मत रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number