मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्ताधारी महायुतीतील समन्वय समितीची बैठक पार पडली. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत महायुतीतील अंतर्गत वादासह राज्यातील रखडलेली महामंडळ आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीवर सखोल चर्चा झाली. अशातच राज्यभरातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेल्या महायुतीच्या महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्याचा तिढा अखेर सुटला आहे. राज्यात महायुतीचे सरकार येऊन जवळपास दोन वर्षानंतरही महामंडळाच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. या महामंडळाबाबत महायुतीमध्ये महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
महायुतीतील महामंडळ वाटपाचा सस्पेन्स संपला?
महायुतीतील समन्वय समितीच्या बैठकीनंतर महामंडळासाठी अजून एक ते दोन बैठका होण्याची शक्यता असून पुढील 15 दिवसात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीतील फॉर्म्युल्यानुसार भाजपला सर्वाधिक 48 टक्के महामंडळे मिळणार असल्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 29 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 23 टक्के महामंडळे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 15 दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सदस्यांच्या अंतिम यादीवर स्वाक्षरी केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
निधी वाटपाट फॉर्मुला ठरला, 30 टक्के निधी पालकमंत्र्यांना
भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’70 टक्के निधी हा विधिमंडळ सदस्यांना दिला जाणार 30 टक्के निधी पालकमंत्र्यांना दिला जाणार आणि ते समन्वयकांनी वाटतील. आता सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहे. अंतर्गत वादाने जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्यात येत आहे त्यांना सूचना देण्यात आले आहे. महायुतीच्या नेत्याबाबत कोणीही टिका करणार नाही. जिल्हा शाळेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात सुधारणा करत आहे. पालकमंत्री डीपीडीसी चा फंड देऊन काम करत आहे. एक वर्षात होणार नाही पण पुढच्या काळात आम्ही शाळा नीट करू. जास्त पट संख्येच्या शाळा आहे त्या आम्ही टकेल करणार.’
15 दिवसांत महामंडळ वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब- चंद्रशेखर बावनकुळे
मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सुचना दिल्या आहेत. 30 वर्षाच्या वरचे विद्यार्थी याबाबत तिथे प्रश्न निर्माण झाले आहे आदिवासी मंत्री यांनी सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. राहुल गांधी यांना खरी परिस्थिती माहीत नाही त्यांना कळेल तेव्हा असे ट्वीट करणार नाही. आज अशी कोणतीच चर्चा झाली नाही. आजच्या बैठकीत आम्हाला उद्भवलेले प्रश्न आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे मांडले. महायुतीच्या समन्वयक समितीची बैठक प्रत्येक दोन महिन्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित होणार. पुढील 15 दिवसांत महामंडळ वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच नेतृत्वबदल कोणतेही चर्चा नहाई विरोधक हे नेतृत्व बदलाची अफवा पसरवत आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तर काही चालणार नाही.