Sunday, June 15, 2025 12:37:35 PM

हगवणेंची हाव पुरवण्यासाठी कस्पटेंचा अमाप खर्च; नवा व्हिडीओ समोर

राज्यात सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु आहे आणि आता हगवणेंचा हावरटपणा समोर आला आहे. चांदीच्या भेट वस्तूंचा हा व्हिडीओ आहे.

हगवणेंची हाव पुरवण्यासाठी कस्पटेंचा अमाप खर्च नवा व्हिडीओ समोर

पुणे : राज्यात सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु आहे आणि आता हगवणेंचा हावरटपणा समोर आला आहे. चांदीच्या भेट वस्तूंचा हा व्हिडीओ आहे. जेव्हापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण बाहेर आलं, तेव्हापासून एक एक व्हिडीओ समोर येत आहेत. हगवणेंची हाव पुरवण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांनी अमाप खर्च केला. 

हगवणेंकडे पाच कोटींची वाहन असल्यानं आम्ही फॉर्च्युनर का मागू? असं म्हणणाऱ्या हगवणेंची पोलखोल करणारा व्हिडीओ समोर आला आहे. अधिकमासाला जावई शशांक अन हगवणे कुटुंबीयांचा ब्रँडेड कपडे, सोन्याची अंगठी घेतानाचा व्हिडिओमध्ये दिसतं आहे. यात शशांकने केवळ स्वतःचा नव्हे तर भाऊ सुशीलचा सुद्धा हट्ट पुरवून घेतला.
हेही वाचा : जनतेसह सरकारसोबत अजित पवार, शिंदेंचा उत्तम संवाद; फडणवीसांच्या विधानावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

हगवणे कुटुंबियांनी लग्नाच्या नावाखाली कस्पटे कुटुंबाला प्रचंड छळल्याचे उघड झाले आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओत अधिकमासाला कस्पटे कुटुंबियांनी जावयाला अंगठी दिली आहे. हगवणे कुटुंबियांना ब्रँडेड कपडे घेतले आहेत. जावई शशांक आणि जावयाचा भाऊन सुशील यांना चांदीचं निरंजन दिलं आहे. तसेच सुशीलला चांदीचे देवाचे तामनाचे ताट देखील दिले आहे. 

अधिकमासात जावई अन् भाऊ सुशीलला कस्पटे कुटुंबीयांनी काय-काय दिलं?
चांदीचे ताट
शशांकला अंगठी
शशांक आणि सुशीलला - चांदीचे निरंजन 
सुशील - चांदीचे देवाचे तामनाचे ताट
तसेच ब्रॅण्डेड कपड्यांचा फुल पोशाख

वैष्णवी हगवणे प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यात नवरा, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सध्या या प्रकरणाची खुलासे समोर येत आहेत. हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विपुल यांची सनद रद्द करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याची टीका हगवणेंच्या वकिलावर अंजली दमानियांनी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री