Wednesday, January 14, 2026 01:37:16 PM

Weather Update : IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली! डिसेंबर महिन्यातील येत्या तीन दिवसांदरम्यान मोठे हवामान बदल होणार

उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत कडक थंडीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

weather update   imd च्या इशाऱ्याने चिंता वाढली डिसेंबर महिन्यातील येत्या तीन दिवसांदरम्यान मोठे हवामान बदल होणार

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचे वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत कडक थंडीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा- Heading : Mahendra Dalvi Viral Video : पैशानं भरलेल्या बॅगेनंतर आता नोटांचं बंडल; दानवेंचा आणखी एक Video Bomb, महेंद्र दळवींनी आरोप झुगारून लावले

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रूझ येथील भागात 18.4 अंश सेल्सिअस किमान तापमान असून कुलाबा केंद्रात सोमवारी 22.2 अंश सेल्सिअस आणि संपुर्ण मुंबईत किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतक असण्याची शक्यता आहे. त्याचसोबत सपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी 8, 9, 10 आणि 11 डिसेंबर रोजी थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानेवर्तावली आहे.

हेही वाचा- Gold Stolen in Train: रेल्वेत मध्यरात्रीचा थरार; लॉक केलेली बॅग गायब, पाच कोटींच्या सोन्याची रहस्यमय चोरी

विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशातील काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ येथे 8.8 अंश सेल्सिअस, गोंदिया 9 अंश सेल्सिअस, अमरावती 9.6 अंश सेल्सिअस, नांदेड 9.9 अंश सेल्सिअस, मालेगाव 9 अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर 9.5अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री