BMC Alert Monsoon Diseases : पावसाळ्यात मुंबईकरांच्या आरोग्यावर संकट! डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; प्रशासन अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ पालिकेकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.

BMC Alert Monsoon Diseases : पावसाळ्यात मुंबईकरांच्या आरोग्यावर संकट! डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; प्रशासन अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनांमुळे आजारांचा धोका वाढला आहे. मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ पालिकेकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत जूनच्या तुलनेत जुलै 2026 मध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि H1N1 (स्वाइन फ्लू)च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

जून आणि जुलै महिन्यातील रुग्णसंख्या
– मलेरिया – 655 वरून 1,380
– डेंग्यू – 266 वरून 466
– चिकुनगुनिया – 7 वरून 7
– लेप्टोस्पायरोसिस – 33 वरून 78
– गॅस्ट्रो – 603 वरून 851
– कोविड-19 – 27 वरून 58
– H1N1 – 58 वरून 105

मलेरिया-डेंग्यूसाठी पालिकेची विशेष मोहीम
पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नियमित सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा नायनाट केला जात आहे. ‘शून्य डास प्रजनन मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मलेरिया नियंत्रणासाठी 54 हजार 605 उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५,म हजार ९६९ ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली. नागरिकांनी पाणी साचू देऊ नये. घरात, घराभोवती तसेच इमारतींच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. जुन्या टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तूंमध्ये पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होऊ शकते. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. ताप आल्यास जवळच्या पालिका दवाखान्यात किंवा रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा.

या सर्वक्षणा दरम्यान 1 जुलै ते 31 जुलैदरम्यान
– 6 लाख 59 हजार 316 घरांचे सर्वेक्षण
– 23 लाख 01 हजार 942 नागरिकांचे सर्वेक्षण
– 75 हजार 650 रक्तनमुने संकलित
– 123 आरोग्य शिबिरे
– 51 हजार 216 नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number