Monday, May 11, 2026 11:34:32 AM

Jay Pawar: 'दादांच्या प्रेमासाठी बारामतीकरांनी निवडणूक मनावर घेतली...'; सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयानंतर जय पवार भावूक

सुनेत्रा पवार यांच्या या विजयानंतर त्यांचे पुत्र जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

jay pawar दादांच्या प्रेमासाठी बारामतीकरांनी निवडणूक मनावर घेतली सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयानंतर जय पवार भावूक

Jay Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. त्यांनी तब्बल 2,18,930 मतांसह ऐतिहासिक विजय संपादन केला असून, हे देशातील आतापर्यंतचे सर्वात मोठे 'लीड' ठरले आहे. या विजयामुळे अजित पवार यांच्या नावावर असलेला जुना विक्रम आता इतिहासजमा झाला असून सुनेत्रा पवार बारामतीच्या नव्या 'विक्रमवीर' ठरल्या आहेत.

जय पवार यांची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवार यांच्या या विजयानंतर त्यांचे पुत्र जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी सर्व बारामतीकरांचे मनापासून आभार मानतो. बारामतीकरांनी ही निवडणूक आदरणीय दादांसाठी (अजित पवार) स्वतःच्या मनावर घेतली होती. बारामती हे आमचे कुटुंब आहे आणि त्यांनी दादांवरील प्रेमापोटी हा इतिहास घडवला आहे. दादांशिवाय आम्हाला अशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे कधी वाटले नव्हते, पण जनतेने आम्हाला खंबीर साथ दिली."

विजयाचा आनंद पण मुलीच्या निधनाचे दुःख
विजयाचा जल्लोष होत असतानाच जय पवार यांनी तालुक्यातील एका दुःखद घटनेचाही उल्लेख केला. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात एका मुलीवर अत्याचार करून तिला संपवण्यात आलं होतं. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "आज विजयाचा मोठा दिवस असला तरी आमचे मन त्या घटनेने सुन्न आहे. वहिनींनी (सुनेत्रा पवार) या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून त्या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर कसा न्याय मिळेल, यासाठी त्या स्वतः प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की, सर्वांनी संयमाने आणि आदराने हा विजय साजरा करावा."

हेही वाचा - Rahuri Bypoll Result: राहुरीत भाजपाची एकहाती सत्ता! अक्षय कर्डिले यांचा विक्रमी विजय; विरोधकांचा सुपडा साफ

जनसेवेचा निर्धार आणि कार्यकर्त्यांना आधार
"मी आधीच बोललो होतो की, मंगळवारी मी सर्वांची भेट घेणार आहे. वहिनी जेव्हा मुंबईत कामकाजासाठी असतील, तेव्हा मी स्वतः बारामतीकरांना आधार देण्याचे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करेन," असा विश्वास जय पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, अनेक जुने सहकारी पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक असून त्यांच्याशी संपर्क सुरू असल्याचेही त्यांनी संकेत दिले.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या