Thursday, March 12, 2026 10:59:39 PM

Ajit Pawar Plane Crash: 'अजितदादांच्या विमानाचा स्फोट करण्यासाठी पायलटने ते मुद्दाम...'; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

आमदार रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत थेट 'घातपाताचा' संशय व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे.

ajit pawar plane crash अजितदादांच्या विमानाचा स्फोट करण्यासाठी पायलटने ते मुद्दाम रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत थेट 'घातपाताचा' संशय व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे. 'वैमानिक कॅप्टन सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवता, स्फोट घडवण्याच्या उद्देशानेच ते जमिनीवर जोरात आदळले,' असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला आहे.

इंधनाच्या 'ओव्हरलोड' टाक्यांवरून उपस्थित केले सवाल
रोहित पवार यांनी या अपघातामागील संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधताना इंधनाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला. त्यांच्या दाव्यानुसार, मुंबई ते बारामती प्रवासासाठी कमी इंधनाची गरज असतानाही, विमानाच्या टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या. केवळ मुख्य टाक्याच नव्हे, तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅन का ठेवले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विमानात 3000 ते 3500 लिटर इंधन असणे हा मोठा स्फोट घडवण्याचाच कट होता, असे पवारांनी नमूद केले.

हेही वाचा - Amol Mitkari On Ajit Pawar Death: "मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा?" मिटकरींनी दादांच्या अपघाती विमानाचा 'तो' फोटो शेअर करताच पुन्हा संशयाला फाटे फुटले

दृश्यमानता नसतानाही लँडिंगचा अट्टाहास का?
हवाई नियमानुसार लँडिंगसाठी 5000 इतकी दृश्यमानता (Visibility) आवश्यक असते. मात्र, अपघाताच्या वेळी बारामतीत ती केवळ 3500 होती. प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानता असतानाही पायलटने विमान पुन्हा मुंबईला न नेता बारामतीतच का उतरवले? आणि एका फेऱ्यानंतर विमान मुद्दाम खाली का आदळले? यामागे मोठा कट असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

'व्हीएसआर' कंपनीकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच रोहित पवार यांनी विमान सेवा पुरवणाऱ्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीवरही तोफ डागली आहे. कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असून, त्यामध्ये फेरफार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "मुंबईत बसणारा 'गोपी' नावाचा हँडलर 'फ्लाईट प्लॅन'मध्ये बदल करू शकतो. दिल्लीहून आलेल्या मूळ प्लॅनमध्ये काही बदल झाले का? हे तपासण्यासाठी संबंधित ईमेलची चौकशी व्हायला हवी. हा केवळ अपघात नसून एका नियोजित कटाचा भाग वाटतो. तपास यंत्रणांनी व्हीएसआर कंपनीचे रेकॉर्ड्स आणि पायलटच्या निर्णयांची सखोल चौकशी करावी," अशी मागणी रोहित पवार यांनी यावेळी केली.


सम्बन्धित सामग्री