Pune Students Stranded In Dubai: स्टडी टूर पडली महागात; दुबईतील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान पुण्यातील 80 विद्यार्थी अडकले

दुबईत अडकलेल्या या विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय सातत्याने काम करत आहे.

Pune Students Stranded In Dubai: स्टडी टूर पडली महागात; दुबईतील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान पुण्यातील 80 विद्यार्थी अडकले

Pune Students Stranded In Dubai: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षाचा फटका पुण्यातील एका प्रसिद्ध शाळेला बसला असून, अभ्यासासाठी दुबईला गेलेले 84 विद्यार्थी आणि शिक्षक तिथे अडकले आहेत. यामध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश आहे. सुदैवाने, हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

परराष्ट्र आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय सतर्क
दुबईत अडकलेल्या या विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय सातत्याने काम करत आहे. संबंधित शाळेने आणि पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हे विद्यार्थी एका 'स्टडी टूर'साठी दुबईला गेले होते, मात्र अचानक सुरू झालेल्या हल्ल्यांमुळे ते तिथेच अडकून पडले. त्यांना लवकरात लवकर विशेष विमानाने मायदेशी आणले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

इराणकडून दुबईवर हल्ल्यांचा वर्षाव का?
इराणचा दुबई किंवा यूएईशी कोणताही थेट वाद नाही. मात्र, 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दुबईतील 'अल-धफ्रा' सारख्या महत्त्वाच्या अमेरिकन हवाई तळांवर इराणने 137 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 209 ड्रोन डागले आहेत. जरी यूएईच्या संरक्षण दलाने बहुतेक हल्ले रोखले असले, तरी क्षेपणास्त्रांच्या ढिगाऱ्यांमुळे दुबईत काही ठिकाणी स्फोट आणि नुकसान झाले आहे.

हेही वाचा – Donald Trump On "खामेनींच्या निधनाने जगभरातील देशांसाठी न्याय मिळाला" इराणवरील हल्ल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत

अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर दबाव वाढवण्याचे तंत्र
इराणने केवळ दुबईच नव्हे, तर कतार, बहरीन, कुवेत आणि जॉर्डन सारख्या देशांनाही लक्ष्य केले आहे, जिथे अमेरिकेची लष्करी उपस्थिती आहे. अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर दबाव आणून हा संघर्ष अधिक तीव्र करणे, हा इराणचा मुख्य उद्देश असल्याचे दिसत आहे. या हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत घबराट पसरली असून परिस्थिती अत्यंत अनिश्चित बनली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number