Weather Update: पुणेकरांसाठी धोक्याचा इशारा! पुढील 24 तास तुफान पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवस राज्यभरात पावसाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. दक्षिण कोकण गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.

Weather Update: पुणेकरांसाठी धोक्याचा इशारा! पुढील 24 तास तुफान पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवस राज्यभरात पावसाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. दक्षिण कोकण गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत आज ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम सुरु राहील. तसेच कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत 'ऑरेंज अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.  

हेही वाचा- Maharashtra Earthquake: महाराष्ट्र पुन्हा हादरले! मध्यरात्री नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, ग्रामस्थांमध्ये भीती

उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुणे घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून ताम्हिणी घाटात 24 तासांत तब्बल 320 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुणे घाटमाथ्याला आज रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा जोर ओसरला असला तरी घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरूच आहे. दरम्यान कोकणात जोरदार तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे. यावेळी 31 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number