Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासासाठी तिसरा पर्याय; नवीन द्रुतगती मार्गाचे काम महिन्याभरात सुरू होणार, ‘असा’ असेल नवा मार्ग

प्रस्तावित 'मुंबई-बेंगळुरू एक्स्प्रेस वे'चा भाग असलेल्या मुंबई-पुणे दरम्यानच्या तिसऱ्या महामार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासासाठी तिसरा पर्याय; नवीन द्रुतगती मार्गाचे काम महिन्याभरात सुरू होणार, ‘असा’ असेल नवा मार्ग

Mumbai-Pune Expressway: मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. प्रस्तावित 'मुंबई-बेंगळुरू एक्स्प्रेस वे'चा भाग असलेल्या मुंबई-पुणे दरम्यानच्या तिसऱ्या महामार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरात या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

प्रकल्पाचा पहिला टप्पा: पागोटे ते चौक
या नवीन महामार्गाची आखणी पूर्णपणे वेगळ्या मार्गाने करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पागोटे (अटल सेतू) ते चौक (कर्जत) या दरम्यानचे काम हाती घेतले जाईल. सुरुवातीला हा रस्ता 8 पदरी असेल, परंतु भविष्यातील गरज लक्षात घेऊन तो 16 पदरी करण्याच्या क्षमतेने 100 मीटर जागेचे संपादन केले जात आहे.

लोणावळा-खोपोली घाटात नवीन रस्ता
सध्याच्या घाटातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून लोणावळा ते खोपोली दरम्यान पूर्णपणे नवीन रस्ता तयार केला जाणार आहे. यामध्ये अत्याधुनिक बोगदे (Tunnels) आणि उड्डाणपुलांचा (Flyovers) समावेश असेल. सध्याची 'मिसिंग लिंक' आणि जुना महामार्ग यांव्यतिरिक्त हा तिसरा स्वतंत्र मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.

पवना खोऱ्यातून खेड-शिवापूरपर्यंत कनेक्टिव्हिटी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन मार्ग लोणावळ्याहून पुढे पवना खोरे आणि मुळशीमार्गे थेट खेड-शिवापूरजवळील शिवरे गावात पुणे रिंग रोडला जोडला जाईल. यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुण्यातील वाहतूक कोंडीत न अडकता थेट पुढे जाता येईल.

हेही वाचा – Vehicle Scrapping : जुनी वाहनं वापरणं आता पडणार महागात! पर्यावरण करात दुप्पट वाढ; पण नव्या गाडीच्या खरेदीवर बंपर सूट

जुना महामार्ग आणि टोलचे गणित
पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी देखील सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावर 2030 पर्यंत टोल वसुलीचे अधिकार 'आयआरबी'कडे असल्याने, याच्या रुंदीकरणाचे काम नेमकं कोण करणार (MSRDC की महामार्ग प्राधिकरण), याचा निर्णय केंद्र सरकार नंतर घेणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number