Avinash Abhyankar: ‘हे सरकार टोलजीवी, काही वर्षानंतर…’; मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या उद्घाटनावरून मनसे नेते अविनाश अभ्यंकरांचा हल्लाबोल

मिसिंग लिंकच्या कामाचे श्रेय घेण्याच्या घाईत सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आरोप अविनाश अभ्यंकर यांनी यावेळी केला.<br/>

Avinash Abhyankar: ‘हे सरकार टोलजीवी, काही वर्षानंतर…’; मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या उद्घाटनावरून मनसे नेते अविनाश अभ्यंकरांचा हल्लाबोल

Avinash Abhyankar: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या उद्घाटनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “हे सरकार केवळ ‘टोलजीवी’ आणि ‘भाषणजीवी’ आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मिसिंग लिंकच्या कामाचे श्रेय घेण्याच्या घाईत सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

उद्घाटनाच्या सोहळ्यात जनता तासनतास अडकली
मिसिंग लिंकच्या उद्घाटनामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासावर बोलताना अभ्यंकर म्हणाले की, “काल लोक ५-६ तास वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. केवळ उद्घाटनाच्या हव्यासापोटी जनतेला असा त्रास देणे कितपत योग्य आहे? हे काम रात्रीतून झालेले नाही, हे अनेक सरकारांच्या काळातील काम आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे लोकांच्या टॅक्सच्या पैशातून उभे राहिले आहे. जनतेने फक्त मतदान करायचे आणि आम्ही किती चांगली कामे करतोय हे दाखवण्यासाठी तुम्ही अडकलात तरी चालेल, ही सरकारची वृत्ती चुकीची आहे. श्रेय घेण्यापेक्षा ज्या कामगारांनी हे काम केले त्यांचा सत्कार केला असता, तर तो कॉमन सेन्स ठरला असता.”

‘मिसिंग लिंक’वरही टोल आकारला जाणार?
टोलच्या मुद्द्यावरून सरकारला घेरताना अभ्यंकर यांनी भाकीत केले की, “हे टोलजीवी सरकार आहे. आज जरी हा मार्ग खुला झाला असला, तरी काही वर्षांनंतर या मिसिंग लिंकवरही टोल लावला जाईल, हे निश्चित आहे. महाराष्ट्रात टोल बंद करण्याचे काम फक्त राज साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांनीच केले होते. आता थोडे दिवस थांबा, तुम्हाला सरकारचे नवनवीन ‘चमत्कार’ दिसायला लागतील.” सुप्रिया सुळे यांच्या प्रवासाचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, जे हजारो लोक काल अडकले होते, त्यांना सरकार काय उत्तर देणार?

हेही वाचा – Bhor Crime: ‘कमीत कमी वेळात नराधमाला मृत्युंदड…’; भोर घटनेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, कठोर कारवाईचे संकेत

मराठी भाषेचा सन्मान आणि राज ठाकरेंचे वेगळेपण
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अभ्यंकर यांनी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “महाराष्ट्र दिन झाला असला तरी, प्रशासनात आणि व्यवहारात जास्तीत जास्त मराठी भाषेचाच वापर झाला पाहिजे. सरकारला हे का समजत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी केवळ राज ठाकरेच रस्त्यावर उतरतात, हेच त्यांचे वेगळेपण असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number