बीड जिल्ह्यातील केज ते मांजरसुंबा या महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबळाचे बरड परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने समोरुन येणाऱ्या पिकपला जोरदार धडक दिली. याच अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले असून पिकपमध्ये असलेली चारही जनावरेही या अपघातात ठार झाली आहेत.
वळणावर काळ आडवा आला
मिळालेल्या माहितीनुसार, पिकपमधून जनावरांची वाहतूक सुरु होती. दरम्यान अंबळाचे बरड येथील वळणावर टिप्पर चालकाचे अचानकनियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा चक्काचूर झाला.
हेही वाचा-आई-वडिलांच्या समोर पोटच्या लेकीचा अंत; तर पालकांची प्रकृती चिंताजनक; नेमकं घडलं काय?
या अपघातामध्ये पिकपमधील हनीफ कुरेशी, आरिफ कुरेशी यांच्यासह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांपैकी एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.