मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता चक्क प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आलेला असून पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झालेली आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सस्पेन्स वाढला
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल ही आरोपी कुणालची प्रेयसी दिल्लीहून मुंबईत घेऊन आल्याचे समोर आलेले आहे. कुणालच्या सांगण्यावरुन तिने हे पिस्तूल आणले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, कुणालने आपल्या प्रेयसीला पिस्तूल आणण्यासाठी सांगितले होते. एवढेच नाही तर तिला मुंबईला येण्यासाठी कुणालने अजून एका तरुणीला सोबत पाठवले होते. दोन्ही तरुणींची मुंबईमध्ये एका रात्री राहण्याची देखील सोय कुणानलेच केली होती, अशी माहिती सध्या समोर आलेली आहे.
पोलिस आता या दोन्ही तरुणींचा शोध घेत असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. हे पिस्तूल नेमके कुठून आणले, कुणी दिले शिवाय या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरु आहे. या नव्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळालेले आहे. फक्त गोळीबार नाही तर या मागे मोठे नेटवर्क असण्याची देखील शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.