Monday, May 11, 2026 01:14:38 PM

Weather Update: आता दुपारीची काळजी घ्या! अवकाळीचं संकट गेलं, पण...; आज IMD चा काय इशारा?

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस आता कुठे कमी झालेला पाहायला मिळतो आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.

weather update आता दुपारीची काळजी घ्या अवकाळीचं संकट गेलं पण आज imd चा काय इशारा

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस आता कुठे कमी झालेला पाहायला मिळतो आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज राज्यभरात तापमान चाळिशीपार गेले असून ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढत असून, उकाड्यात वाढ होत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. कोकणासह मराठवाडा, विदर्भात पारा चाळिशी पार गेल्याने उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती राहणार आहे. तसेच येत्या 3 दिवसांत पावसाचा कोणताही अलर्ट नसून राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. 

‎कोकणात आज कमाल तापमान 22.2 अंश तर किमान तापमान 34.8 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज कमाल तापमान 15.0 अंश तर किमान तापमान 38.8 अंश सेल्सिअस इतके राहिल. मराठवाड्यात आज कमाल तापमान 18.9 अंश तर किमान तापमान 39.0 अंश सेल्सिअस इतके आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज कमाल तापमान 20.4 अंश तर किमान तापमान 40.0 अंश सेल्सिअस इतके आहे. तर विदर्भात आज कमाल तापमान 19.4 अंश तर किमान तापमान 40.1 अंश सेल्सिअस इतके आहे.

हेही वाचा- Weather Update : हवामानात होणार मोठा बदल, कुठे बरसणार सरी तर कुठे तापमान जाणार चाळीशी पार...; जाणून घ्या

आज कोकणासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत आणि सिंधुदुर्ग येथे कमाल तापमान 34-36 अंशांपर्यंत राहील. ज्यामुळे हवामानात उष्ण आणि दमट स्थिती राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. विदर्भ, मराठवाडापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. एकीकडे मराठवाड्यात कमाल तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पारा 42 अंशांवर गेला आहे. यावेळी अकोला येथे 40.1 अंश सेल्सिअस तर गडचिरोली आणि सोलापूर येथे 40 अंश सेल्सिअस आणि परभणी, अमरावती, वर्धा येथे 39 अंश से‌ल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

तसेच मध्य महाराष्ट्रात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरात येत्या काही दिवसांत तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि नंदुरबारमध्ये कमाल तापमान 34-39 अंशांवर राहील. तसेच धुळे येथे तापमान नीचांकी 15 अंश से‌ल्सिअस तापमान नोंदले गेले. ज्यामुळे आज राज्यभर हवामान उष्ण आणि कोरडे जाणवेल. 


सम्बन्धित सामग्री