Pune Tribal Students Protest: पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा; नेमक्या काय आहेत मागण्या?

13 ऑगस्टपासून मांजरी भागातील आदिवासी वसतिगृहात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

Pune Tribal Students Protest: पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा; नेमक्या काय आहेत मागण्या?

Pune Tribal Students Protest: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 13 ऑगस्टपासून मांजरी भागातील आदिवासी वसतिगृहात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून स्वारगेट ते थेट जे एम रोड असा भव्य मोर्चा काढण्यात आला असून यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. बेमुदत उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याचेही समोर आले आहे.

'छात्र की गूंज'मधील राहुल गांधींना प्रश्न विचारणारी मुलगीही सहभागी
या मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या 'छात्र की गूंज' या संवाद कार्यक्रमात रोखठोक प्रश्न विचारून चर्चेत आलेली आदिवासी विद्यार्थिनीही या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या मूळ समस्या सोडवण्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात सहभाग नोंदवला.

वसतिगृह शहराच्या मध्यवर्ती भागात हलवण्याची मुख्य मागणी
सध्या मांजरी भागात असलेले शासकीय आदिवासी वसतिगृह विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे हे वसतिगृह तात्काळ पुण्याच्या मध्यवर्ती भागात हलवण्यात यावे, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. लांबच्या अंतरामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन शैक्षणिक कामांमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तसेच, शासनाने 5 ऑगस्ट रोजी जारी केलेला नवीन सरकारी निर्णय (GR) अत्यंत अन्यायकारक असून त्याचा थेट फटका आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवलतींवर पडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हा वादग्रस्त शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, ही या आंदोलनातील एक प्रमुख अट आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis: 'अयोध्येत आमच्यावर गोळी चालली, अटक केली, मी…'; फडणवीसांनी सांगितली 20 व्या वर्षी घडलेली 'ती' आठवण

गडचिरोली सर्पदंश दुर्घटनेतील पीडितांना न्याय आणि 1 कोटींची भरपाई
गडचिरोली जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेत (आश्रमशाळेत) सर्पदंश होऊन 3 निष्पाप मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संवेदनशील घटनेचे तीव्र पडसाद या मोर्चात उमटले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित प्रशासकीय व राजकीय अधिकाऱ्यांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number