Sunday, June 15, 2025 11:50:39 AM

राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन; तिरंगा रॅलीतून शौर्याला सलाम

काही दिवसांपासून राज्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन तिरंगा रॅलीतून शौर्याला सलाम

मुंबई : काही दिवसांपासून राज्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला  घेतला. त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. आज नागपुरात भाजपाची तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग होता. 

नागपुरात भाजपाकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी संपूर्ण भारतीय सैन्याच्या पाठीशी आहेत. तसेच देशाचे पंतप्रधानही पाठीशी आहे. त्यामुळे केवळ शहरातच नाही तर ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे आणि हे पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढली असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच अतिशय भव्य तिरंगा यात्रा खापरखेडा येथे काढण्यात आली. आशिष देशमुख यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं होतं. इथे पक्षाचा विषय नाही ही भारताची तिरंगा यात्रा आहे. तर डोंबिवलीत तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले. यामध्ये नेत्यांसह सामान्य नागरिकांनीही सहभाग घेतला. 

हेही वाचा : 'दुश्मन बॉर्डरपारच नसतो; घरातही असतो' पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रासह सहा जण अटकेत

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा रॅलीत सर्वधर्मीयांचा सहभाग पाहायला मिळाला. या रॅलीत देशभक्तीपर गीतांचा गजर दिसून आला. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी तसेच युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात मालेगावात भव्य ' तिरंगा रॅली ' काढण्यात आली. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत हातात तिरंगा ध्वज घेऊन आर्मी जवानांसह हजारो सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले. शिवतीर्थापासून निघालेली ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोसम पूल, महात्मा जोतिबा फुले सर्कल आदी मार्गाने शासकीय विश्राम गृहापर्यंत नेण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली.तसेच अमरावती जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार नवनीत राणा यांचाही तिरंगा रॅलीत सहभाग होता.  

जालन्यात सर्व पक्षीय आणि संघटनेकडून 75 फुट तिरंगा हातात घेऊन रॅली काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूर मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं. त्यामुळं भारतीय सैन्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातील मामा चौकापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत माजी सैनिकांसह सर्व नागरिकांनी 75 फुट तिरंगा हातात घेऊन मोठा सहभाग घेतला. संपूर्ण भारतीय सैनिकांच्या पाठिशी आहेत. हा विश्वास जालन्यातील नागरिकांनी दर्शवला आहे.

बीडच्या आष्टीत तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्त्वात रॅलीचे आयोजन करण्यात आली. तसेच भारतीय जवानांच्या समर्थनार्थ आज नवी मुंबईत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील ब्लू डायमंड चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जवानांनी दाखवलेले सामर्थ्य आणि ऑपेरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्याबद्दल भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबईकर तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


सम्बन्धित सामग्री