शिवसेनेच्या चिन्हाचा वाद कोर्टात पोहोचला, तृणमूल काँग्रेसमध्येही चिन्हाचा पेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

पश्चिम बंगालमधील ऑल इंडिया तृणमूस काँग्रेस म्हणजेच एआयटीसीमधील पक्षाचे नाव तसेच निवडणूक चिन्ह तसेच संघटनात्मक नियंत्रणावरुन सुरु असलेल्या वादाला आता एक नव वळ मिळाले आहे.

शिवसेनेच्या चिन्हाचा वाद कोर्टात पोहोचला, तृणमूल काँग्रेसमध्येही चिन्हाचा पेच,  निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

दिल्ली : पश्चिम बंगालमधील ऑल इंडिया तृणमूस काँग्रेस म्हणजेच एआयटीसीमधील पक्षाचे नाव तसेच निवडणूक चिन्ह तसेच संघटनात्मक नियंत्रणावरुन सुरु असलेल्या वादाला आता एक नव वळ मिळाले आहे. या सर्व प्रकरणात निवडणूक आयोगाने 17 सप्टेंबर 2026 रोजी महत्त्वाचा आदेश जारी केलेला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, टीएमसीचे असलेले दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना आता आगामी पोटनिवडणुकांमध्ये 'फूल' आणि 'गवत' हे राखीव असलेले निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही चिन्ह सध्या ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेससाठी राखीव आहे, त्या कारणामुळेच दोन्ही गटांना आता स्वतंत्र निवडणूक चिन्हांसह मैदानात उतरावे लागेल. दोन्ही गटांना निवडणूक आयोगाच्या अधिसूचित 'फ्री सिम्बॉल्स'च्या यादीमधून तीन चिन्हांचे पर्याय हे पसंतीक्रमानुसार सादर करावे लागणार आहेत. आयोग हे त्यापैकी एका चिन्हाला संबंधित गटासाठी मंजुरी देईल.

हेही वाचा-Maharashtra Board: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पहिला पेपर कधी?

TMCच्या दोन्ही गटांना स्वतंत्र नाव-चिन्ह मिळणार
महत्त्वाचे म्हणजे दोन्ही गटांना स्वतंत्र पक्षनाव निवडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. प्रत्येक गटाला 3 नावांचे पर्याय हे पसंतीक्रमानुसार आयोगाकडे सादर करावे लागणार आहे. या नावांमध्ये 'All India Trinamool Congress' या मूळ पक्षाच्या नावाशी असलेल्या संबंधित पर्यायांचाही समावेश असू शकतो. मात्र, शेवटच्या नावाला मान्यता देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे असेल. दोन्ही गटांना आज सकळी 11 वाजेपर्यंत आपले नाव आणि चिन्हांचे पर्याय हे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.

TMCच्या चिन्हावरून दोन्ही गट आमनेसामने
गवत आणि फूल हे दोन्ही चिन्ह टीएमसीशी जोडलेले असून आयोगाच्या नोंदींमध्ये ते एआयटीसीचे राखीव असलेले चिन्ह आहे. पक्षाचे नाव, चिन्ह तसेच संघटनात्मक नियंत्रणावरुन दोन्ही गटांचे दावे हे आयोगासमोर सुरु झालेले आहेत. गेल्या 12 सप्टेंबरपासून आयोगाने या दाव्यांवरील सुनावणीला सुरुवात केली होती. मात्र, आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही गटांना स्वतंत्र नाव तसेच स्वतंत्र निवडणूक चिन्हासह निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number