FDA action on Milk: तुकाराम मुंढेंचा दूध माफियांना दणका; महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायासाठी नवी नियमावली; उल्लंघन केल्यास थेट 10 लाखांचा दंड

राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच एक विशेष पत्रकार परिषद घेऊन दूध व्यावसायिक आणि उत्पादकांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे.

FDA action on Milk: तुकाराम मुंढेंचा दूध माफियांना दणका; महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायासाठी नवी नियमावली; उल्लंघन केल्यास थेट 10 लाखांचा दंड

FDA action on Milk: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या प्रकारांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच एक विशेष पत्रकार परिषद घेऊन दूध व्यावसायिक आणि उत्पादकांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे. बाजारात ग्राहकांना पूर्णपणे शुद्ध आणि दर्जेदार दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ मिळावेत, हाच या नव्या नियमांमागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Dattatray Bharne: महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा; खरिपाच्या पेरण्या अन् खतांच्या दरांबाबतही दिली महत्त्वाची माहिती

पॅकिंगवर संपूर्ण माहिती देणे आता बंधनकारक
मुंढे यांनी जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यातील सर्व दूध संकलन केंद्रे आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या आस्थापनांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या आइस्क्रीम, कुल्फी आणि इतर तत्सम पदार्थांमध्ये नेमके कोणते घटक वापरले आहेत, याची स्पष्ट नोंद आता उत्पादकांना करावी लागेल. यामध्ये ब्रँड कोड, वापरलेले कंडेन्स्ड मिल्क किंवा इतर दुय्यम घटकांची सविस्तर माहिती अन्नपदार्थांच्या पॅकेटवर (Food Package) छापली जाणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, बाजारात ग्राहकांनी किंवा दुकानदारांनी सील तुटलेले किंवा पॅकिंगसोबत छेडछाड झालेले कोणतेही पदार्थ खरेदी किंवा विक्री करू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आणि भेसळीवर कठोर कारवाई
अन्नपदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध एफडीएने आता दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे. जर एखादा विक्रेता किंवा उत्पादक भेसळयुक्त पदार्थांची विक्री करताना पकडला गेला, किंवा आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल करताना दोषी आढळला, तर त्याला तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. या नव्या आणि कडक नियमांमुळे राज्यातील दूध व्यवसायात पारदर्शकता येईल आणि भेसळ करणाऱ्या माफियांना चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number