Sambhajinagar Road Accident : कारने विरुद्ध दिशेने येऊन उडवले, दुचाकीचा चक्काचूर; दोन सख्ख्या भावांचा अपघातात करुण अंत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील आयटी पार्कमागील रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. निखिल अंकुश आरके आणि कपिल अंकुश आरके अशी मृत भावांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे बीड जिल्ह्यातील असून कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. बुधवारी रात्री […]

Sambhajinagar Road Accident : कारने विरुद्ध दिशेने येऊन उडवले, दुचाकीचा चक्काचूर; दोन सख्ख्या भावांचा अपघातात करुण अंत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील आयटी पार्कमागील रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. निखिल अंकुश आरके आणि कपिल अंकुश आरके अशी मृत भावांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे बीड जिल्ह्यातील असून कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी जात असताना समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमी भावांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान पहाटे दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Boat Capsizes In River : बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रसावी, नदीच्या मधोमधच उलटली बोट; 50 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांमध्ये 40 लहान मुलांचा समावेश

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number