Thursday, July 17, 2025 02:55:06 AM

भिवंडीतील कामवारी नदीत बुडून‌ दोन भावांचा मृत्यू

भिवंडीतील कामवारी नदीत दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. एक भाऊ बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने नदीत उडी मारली. त्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

भिवंडीतील कामवारी नदीत बुडून‌ दोन भावांचा मृत्यू

भिवंडी: भिवंडीतील कामवारी नदीत दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. एक भाऊ बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने नदीत उडी मारली. त्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अक्षय आणि सागर अशी या दोन भावांची नावं आहेत.  अक्षयचे वय 25 होते तर सागरचे वय 30 होते आणि तो विवाहित होता. त्याला 3 वर्षाची मुलगी होती. सागरच्या मृत्यूने लहान लेकरु पोरके झाले आहे. दोन्ही भावाच्या मृत्यूने भिवंडीत दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत मासेमारीचे जाळे काढण्यासाठी गेलेल्या भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील अक्षय परशुराम धुमाळ (25) हा भोवळीत अडकला. हे पाहून त्याला मदत करण्यासाठी गेलेले त्याचा मोठा भाऊ सागर परशुराम धुमाळ (30) विवाहित, यानेही नदीत उडी मारली. ज्यामुळे दोन्ही भावांचा नदीच्या पाण्यातील भोवऱ्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक कैलाश संतराम ठाकरे यांनी सांगितले की, सागरचे लग्न फक्त 4 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्याला 3 वर्षांची मुलगी आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा : मराठवाड्यातील 'या' चार जिल्ह्यांना यलो अलर्ट

शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता कामवारी नदीत दोन्ही भाऊ बुडाले होते. एनडीआरएफच्या पथकाने संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. परंतु गावकऱ्यांनी हिंमत हारली नाही आणि शोध सुरूच ठेवला. आज सकाळी 8 वाजण्यापूर्वी, गावकऱ्यांनी मोठा भाऊ सागरचा मृतदेह नदीतून बाहेर काढला आणि काही मिनिटांनी, धाकटा भाऊ अक्षयचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. दोघांचेही मृतदेह भिवंडी शहरातील शासकीय इंदिरा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या गावी आणले जातील. त्यांनंतर त्यांचे अंतिम संस्कार गोरसाई गावात केले जातील.

 


सम्बन्धित सामग्री