Western Railway: लोकल प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! मुंबईत दोन ट्रेन समोरासमोर आल्याने खळबळ

मुंबईतील ग्रँड रोड स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने मोठी खळबळ उडाली.

Western Railway: लोकल प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! मुंबईत दोन ट्रेन समोरासमोर आल्याने खळबळ

मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी रात्रीचा प्रवास काही काळासाठी धडकी भरवणारा ठरला. पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रँट रोड स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने दोन्ही मोटरमननी वेळीच प्रसंगावधान राखत ब्रेक लावल्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. या घटनेनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास ग्रँट रोड परिसरात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याचं मोटरमनच्या लक्षात आलं. दोन्ही गाड्या काही अंतरावर समोरासमोर दिसताच तातडीने ब्रेक लावण्यात आले. त्यामुळे काही क्षण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात लागू; धरणांतील साठा खालावल्याने BMC चा मोठा निर्णय

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. काही वेळ गाड्या थांबवण्यात आल्या आणि नंतर त्यांना वेगवेगळ्या मार्गांवर वळवण्यात आलं. मात्र या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेवरील अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं. अनेक लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याने विविध स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.

रात्री उशिराची वेळ असल्याने कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बराच वेळ थांबावं लागलं. काही ठिकाणी गाड्यांमध्ये चढण्यासाठी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे.

हेही वाचा: Gold Import Duty: सोनं खरेदीदारांसाठी मोठी सूचना; आयात शुल्कवाढीवर चर्चा, काय होणार परिणाम?

दरम्यान या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबईसारख्या शहरात दररोज लाखो प्रवासी लोकलवर अवलंबून असताना अशा प्रकारच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. सिग्नल यंत्रणा आणि तांत्रिक व्यवस्थेची नियमित तपासणी होते का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून नेमकी चूक कुठे झाली याचा शोध घेतला जात आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने मुंबईकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number