Devkund Waterfall Tragedy: प्रशासकीय बंदी झुगारणं जीवावर बेतलं; पुण्यातून रायगडला गेलेल्या 17 पर्यटकांपैकी दोघांना देवकुंड धबधब्यात जलसमाधी

पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या 17 जणांच्या एका ग्रुपमधील दोन तरुण धबधब्याच्या पात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून बेपत्ता झाले. <br/>

Devkund Waterfall Tragedy: प्रशासकीय बंदी झुगारणं जीवावर बेतलं; पुण्यातून रायगडला गेलेल्या 17 पर्यटकांपैकी दोघांना देवकुंड धबधब्यात जलसमाधी

Devkund Waterfall Tragedy: रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पुण्याच्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या 17 जणांच्या एका ग्रुपमधील दोन तरुण धबधब्याच्या पात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून बेपत्ता झाले. 

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने या धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही हे पर्यटक सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून धबधब्यापर्यंत पोहोचले कसे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू केला आहे.

नंदुरबारमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू 

दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथेही अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. रंगवाली नदीच्या शेंड्या डुब परिसरात आंघोळीसाठी गेलेल्या 3 मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. मृतांमध्ये 10 वर्षीय आवेश अजिज मक्राणी आणि 13 वर्षीय अमान जावीद सैय्यद या दोन सख्ख्या भावांचा समावेश असून, या दुर्घटनेमुळे मक्राणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा – Mumbai : मुंबईत माणुसकीला काळीमा! बिल्डिंगच्या वॉचमनचं 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत राक्षसी कृत्य; वॉशरूममध्ये घुसला अन्…

या घटनेत गंभीर बिघडलेल्या 13 वर्षीय फरान अजिज मक्राणी या तिसऱ्या मुलाला वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न करून वाचवले असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवापूर पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला असून, पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक नदी, तलाव किंवा जलसाठ्यांमध्ये उतरू देऊ नये, असे कडक आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number