Ambernath Firing : अंबरनाथ हादरलं! दुचाकीवरुन आले अन्… अंबरनाथमध्ये भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार

मोठी बातमी समोर येत आहे. निवडणुकांचे वारे वाहत असताना अंबरनाथमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. अंबरनाथ शहरातील भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार केला आहे.

Ambernath Firing : अंबरनाथ हादरलं!  दुचाकीवरुन आले अन्… अंबरनाथमध्ये भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार

मोठी बातमी समोर येत आहे. निवडणुकांचे वारे वाहत असताना अंबरनाथमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. अंबरनाथ शहरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले.

हेही वाचा- Donald Trump: अमेरिकेत जाणाऱ्यांना धक्का! ट्रम्प सरकारचा पाच देशांवर ट्रॅव्हल बॅन, प्रवेश नियम अधिक कडक

अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे. दरम्यान या भीषण हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  मात्र नगर परिषदेच्या अवघे दोन दिवस बाकी असताना भाजपच्या उमेदवार कार्यालयावर गोळीबार झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची सर्व दृश्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number