Sunday, March 08, 2026 11:05:27 PM

Ulwe Coastal Road: 21.8 किमीचा अटल सेतू आणि 6.7 किमीचा उलवे कोस्टल रोड; दक्षिण मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवासाचे अंतर आता अवघ्या 40 मिनिटांवर

या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून प्रवासाचा वेळ 120 मिनिटांवरून 30 ते 40 मिनिटांवर येईल, तसेच अलिबाग-कोकणसाठी नवा मार्ग उपलब्ध होईल.

ulwe coastal road 218 किमीचा अटल सेतू आणि 67 किमीचा उलवे कोस्टल रोड दक्षिण मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवासाचे अंतर आता अवघ्या 40 मिनिटांवर

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न साकार होत असतानाच, सिडकोने आता या परिसरातील दळणवळणाचे जाळे अधिक सक्षम करण्यावर मोर्चा वळवला आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या 'अटल सेतू'ला थेट विमानतळाशी जोडण्यासाठी 'उलवे सागरी किनारा मार्ग' (Ulwe Coastal Road) निर्णायक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर कोकण आणि अलिबागसाठी देखील प्रगतीची नवी कवाडे उघडली जाणार आहेत.

गती आणि प्रगतीचा नवा संगम

देशातील सर्वात लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतूमुळे मुंबई आणि न्हावा-शेवा आधीच जवळ आले आहेत. मात्र, या पुलाचा खरा फायदा विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी व्हावा, या उद्देशाने सिडको 6.7 किलोमीटर लांबीचा सहा पदरी उलवे कोस्टल रोड विकसित करत आहे. हा मार्ग शिवाजी नगर इंटरचेंजवरून अटल सेतूला जोडला जाईल, ज्यामुळे दक्षिण मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही अडथळा विना थेट आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचता येईल.

वेळेची मोठी बचत

सध्या दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत येण्यासाठी प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, कोस्टल रोड आणि लिंक रोडचे काम पूर्ण होताच हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. सध्या लागणारा साधारण दोन तासांचा (120 मिनिटे) वेळ हा केवळ 30 ते 40 मिनिटांवर येणार आहे. अमरा मार्गापासून सुरू होणारा हा मार्ग बेलापूर, सीवूड्स, बामणडोंगरी आणि तारघरमार्गे थेट शिवाजी नगरपर्यंत जात असल्याने अंतर्गत शहरातील वाहतुकीचा ताणही कमी होईल.

हेही वाचा: Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज पैशांच्या व्यवहारांवर ठेवावे खास लक्ष, तर या राशींनी संयम बाळगावा, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस?

कोकण आणि अलिबागसाठी 'शॉर्टकट'

सिडकोने केवळ विमानतळाचा विचार न करता भविष्यातील गरजा ओळखून या मार्गाला द्रोणागिरीमार्गे 'करंजा-रेवस' खाडीपुलाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे. हा दुवा कार्यान्वित झाल्यास मुंबईकरांना अलिबाग किंवा कोकणात जाण्यासाठी जुन्या आणि गर्दीच्या मार्गांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका

पाम बीच रोड, बेलापूर आणि शीव-पनवेल महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी ही नवी मुंबईची मोठी समस्या आहे. उलवे कोस्टल रोडमुळे ही अवजड आणि वेगवान वाहतूक शहराबाहेरून वळवली जाईल. नेरूळ-उरण रेल्वे लाईनवरून जाणारा उड्डाणपूल या मार्गातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, यामुळे स्थानिक प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळेल.

हेही वाचा: Dhananjay Munde : कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा, अंजली दमानियांचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले


सम्बन्धित सामग्री