Wednesday, May 14, 2025 11:09:44 PM

पुणेकरांसाठी खुशखबर; पुणे विमानतळावर दहा रुपयात चहा आणि वीस रुपयात कॉफी

पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पुणे विमानतळावर 10 रुपयांत चहा मिळणार आहे. त्यासोबतच, 20 रुपयांत कॉफी मिळणार आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर पुणे विमानतळावर दहा रुपयात चहा आणि वीस रुपयात कॉफी

पुणे: पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पुणे विमानतळावर 10 रुपयांत चहा मिळणार आहे. त्यासोबतच, 20 रुपयांत कॉफी मिळणार आहे. सोमवारी, पुणे विमानतळावर उडान यात्रा कॅफेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

विमान प्रवासादरम्यान अनेकदा प्रवाशांना खाद्यपदार्थांची आवश्यकता असते. मात्र विमानतळावर असलेले खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे, बऱ्याचदा प्रवाशांची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने उडान यात्रा कॅफेची योजना आणली आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कॅफेचे उद्घाटन पुणे विमानतळावर करण्यात आले. या योजनेमुळे, प्रवाशांना आता विमानतळावर कमी दरात खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. उडान यात्रा कॅफेमध्ये चहा आणि पाणी केवळ 10 रुपयांत आणि 20 रुपयांत कॉफी मिळणार आहे. ज्यामुळे, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले भारतात

यादरम्यान, पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, लवकरच हे नवीन टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यासोबतच, या नव्या टर्मिनलमुळे विमानतळाची क्षमता आणखी वाढणार आहे. यामुळे, प्रवाशांना आणखी चांगल्या सुविधा मिळू शकतात. त्यासोबतच, या नवीन टर्मिनलमध्ये 204 चारचाकी गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा केली असून, 200 दुचाकी आणि 15 चारचाकी गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री