Jitendra Awhad : आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली; ‘गर्वाचे घर नेहमी खाली होतं’, म्हणत आव्हाडांचा शेलारांवर पलटवार

उरण नगरपरिषद निवडणुकीत आशिष शेलार यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार करत महाविकास आघाडीची ताकद दाखवली.

Jitendra Awhad : आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली; ‘गर्वाचे घर नेहमी खाली होतं’, म्हणत आव्हाडांचा शेलारांवर पलटवार

मुंबई: आगामी उरण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत शेलारांच्या विधानाला एकप्रकारे आव्हान दिले. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या वेळी जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने हजर होते.

हेही वाचा: Gen-Z protest : GEN-Z काय ऐकत नाही! श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता 'या' देशात GEN-Z ची खदखद; त्यांची मागणी काय?

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसोबत बोलताना आशिष शेलार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आशिषजी, गर्व बाळगणाऱ्याचे घर नेहमी रिकामं होतं. राजकारणात एवढा गर्व असून चालत नाही. नाहीतर घर नेहमी खाली होतं. सूरज निकलता है तो रात को डुबता भी है, हे शेलारांनी आठवणीत ठेवावं," असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांच्या 'महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजवणार' या टीकेला जोरदार उत्तर दिले.

उरणमध्ये घेतलेल्या या उमेदवारी मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा जल्लोष दिसून आला. काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी याच निवडणुकीत महायुतीला प्रचंड पाठिंबा मिळेल आणि विरोधकांना धक्का बसणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. यंदा भाजप – शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत असल्याने उरणची निवडणूक अधिकच रंगतदार आणि चर्चेचा विषय बनली आहे.

हेही वाचा: Indurikar Maharaj New Video : ट्रोलिंगनंतर आता इंदुरीकर महाराजांचा दुसरा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, 'कितीही बोंब मारा, लग्न तर…'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number