Wednesday, July 09, 2025 09:00:21 PM

'नगरविकास विभागाने वाहतूकीच्या नियमावलीमध्ये बदल करणेचे आवश्यक'

रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे.

नगरविकास विभागाने वाहतूकीच्या नियमावलीमध्ये बदल करणेचे आवश्यक

मुंबई: रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे असून त्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) प्रदेशात नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

मंत्री सरनाईक म्हणाले, भविष्यात शहराच्या विकास आराखड्यातमध्ये महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक ठरणार आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन 14 सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA ) प्रदेशातील महापालिकांना पाठवावा. 

हेही वाचा : National HIV Testing Day: एचआयव्ही रोखण्यासाठी वेळेवर चाचणी का महत्त्वाची? जाणून घ्या

यावेळी बोलताना नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले, भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या मोकळ्या जागेवर पे ॲड पार्क वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे .तसेच खाजगी सोसायटी व जागा मालकांच्या पूर्व परवानगीने कार्यालयीन वेळेच्या पश्चात(रात्री 12-6) पे ॲड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील महापालिकेने चाचपणी करणे आवश्यक आहे. याबरोबरच जे रस्ते रुंद आहेत, त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे महापालिकेने एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे .तसेच पे ॲड पार्क वर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपा शिवाय होण्यासाठी फास्ट टॅग वर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणे शक्य होईल. 

याबरोबरच पार्किंगचे शुल्क हे अतिशय कमी ठेवावेत जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील, अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली. 

भुमीअंतर्गत पार्किंग व्यवस्था निर्माण करा
महानगरातील जागेची कमतरता लक्षात घेता उद्याने व बगीचा यांच्या खाली भूमी अंतर्गत पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, ठाणे शहरांमध्ये ठाणे महापालिकेने अशा प्रकारचा उपक्रम राबवला असून तो पथदर्शक असल्यामुळे इतर महापालिकेने देखील त्यांचं अनुकरण करावे असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.


सम्बन्धित सामग्री