Wednesday, June 18, 2025 03:46:03 PM

JCB फसवणूक प्रकरणात हगवणे कुटुंबीयांसोबत इंडसइंड बँकही चौकशीच्या फेऱ्यात

हगवणे कुटुंबीयांवर वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर आता JCB फसवणुकीचा आरोप; इंडसइंड बँकेची चौकशी सुरू, शशांक व लता हगवणे पोलीस कोठडीत; बनावट कागदपत्रांची शक्यता.

jcb फसवणूक प्रकरणात हगवणे कुटुंबीयांसोबत इंडसइंड बँकही चौकशीच्या फेऱ्यात

पुणे: वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांवर आणखी एक गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांवरील JCB विक्री फसवणूक प्रकरणात आता थेट इंडसइंड बँकेचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे यांच्याकडून JCB मशीन खरेदी केली होती. त्यांनी त्यासाठी 11 लाख 70 हजार रुपयांचा व्यवहार केला होता. मात्र काही दिवसांनंतर ही JCB मशीन जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, ही मशीन जप्त केल्यानंतरही शशांक हगवणे यांनी ती पुन्हा ताब्यात घेतली. या प्रक्रियेत इंडसइंड बँकेची भूमिका काय होती, हे स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी बँकेची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा: भंडाऱ्यात पाच वर्षांत 20 बालविवाह उघड; पालकच जबाबदार, सहा प्रकरणांत गुन्हे दाखल

या प्रकरणात शशांक हगवणे आणि त्यांची आई लता हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात, त्यांनी JCB मशीन संदर्भात बनावट दस्तऐवज तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने पोलिसांच्या अर्जाचा स्वीकार करत तात्पुरती तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणातही हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप आहेत. वैष्णवीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयांनी काही पूर्वतयारी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, तिच्या लहान बाळासोबत गैरवर्तन झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. निलेश चव्हाण या व्यक्तीवर बाळाशी गैरवर्तणुकीचा संशय असून, यामुळे वैष्णवीवर मानसिक ताण आला होता का, हे तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती लवकरच समोर येणे अपेक्षित आहे.

हेही वाचा: 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याच्या बातमीत अर्धसत्य; चित्रा वाघ यांचा खुलासा
 


सम्बन्धित सामग्री