मुंबईची लाइफ लाइन असलेल्या रेल्वेमध्ये गेले दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या घटना घडत असून मुंबईकरांना संयम बाळगण्यात आवाहन रेल्वे तर्फे करण्यात येत आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नुकतीच लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
इतकचं नव्हे तर चर्चगेट-विरार लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली आहे. चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये झालेल्या या राड्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच मुंबबईच्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये नशा करणाऱ्या प्रवाशांचे प्रकार वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या घटनांमुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सुरक्षित आणि निर्भय प्रवास हा प्रत्येक प्रवाशाचा अधिकार असून त्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे.