Vidyanand Bapat: DJ लावल्यास 15 लाखांचा दंड आणि 5 वर्षांची शिक्षा? विद्यानंद बापट यांची आक्रमक मागणी

गणेशोत्सवाआधी DJ बंदीवरून गाजलेले विद्यानंद बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासह महाराष्ट्रात DJ वर पूर्ण बंदी असावी म्हणून बापट यांनी मोठा एल्गार पुकारला होता. त्यांच्या या भूमिकेविरोधात DJ चालक, लाईट आणि साऊंड सिस्टिम व्यावसायिकांनी पोटापाण्याचा प्रश्न पुढे करत आंदोलन केले होते. वाद वाढल्यावर सरकारने मध्यस्थी करत DJ च्या आवाजाची Decibel मर्यादा ठरवून दिली होती. […]

Vidyanand Bapat: DJ लावल्यास 15 लाखांचा दंड आणि 5 वर्षांची शिक्षा? विद्यानंद बापट यांची आक्रमक मागणी
DJ Ban Fine

गणेशोत्सवाआधी DJ बंदीवरून गाजलेले विद्यानंद बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासह महाराष्ट्रात DJ वर पूर्ण बंदी असावी म्हणून बापट यांनी मोठा एल्गार पुकारला होता. त्यांच्या या भूमिकेविरोधात DJ चालक, लाईट आणि साऊंड सिस्टिम व्यावसायिकांनी पोटापाण्याचा प्रश्न पुढे करत आंदोलन केले होते. वाद वाढल्यावर सरकारने मध्यस्थी करत DJ च्या आवाजाची Decibel मर्यादा ठरवून दिली होती. गणेशोत्सवात अनेक मंडळांनी नियम पाळला, पण काही ठिकाणी खुलेआम नियम धाब्यावर बसवण्यात आले.

आता जय महाराष्ट्र वाहिनीशी Live बोलताना विद्यानंद बापट यांनी मोठं विधान केलंय – “पुण्यात ध्वनी प्रदूषण करणाऱ्याला 15 लाखांचा दंड आणि 5 वर्षांची शिक्षा झालीच पाहिजे.” इतकंच नाही, तर पुणे पोलिसांचे विसर्जन मिरवणुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बापट यांच्या या ‘शिक्षा सुनावो’ भूमिकेमुळे पुण्यात पुन्हा एकदा DJ वाद तापण्याची शक्यता आहे.

 

Vidyanand Bapat : पुणे पदवीधर निवडणुकीत ‘बापट फॅक्टर’ची चर्चा! विद्यानंद बापट आता निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number