Shirdi Sai Baba Darshn : शिर्डी साईभक्तांसाठी मोठी बातमी! VIP दर्शनाच्या शुल्कात वाढ, आता दर्शनासाठी मोजावे लागणार इतके रुपये

शिर्डीतूल साईंच्या दर्शनासाठी आता सामान्य भक्तांसाठी  महागला आहे. शिर्डींतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात.

Shirdi Sai Baba Darshn : शिर्डी साईभक्तांसाठी मोठी बातमी! VIP दर्शनाच्या शुल्कात वाढ, आता दर्शनासाठी मोजावे लागणार इतके रुपये

शिर्डीतूल साईंच्या दर्शनासाठी आता सामान्य भक्तांसाठी  महागला आहे. शिर्डींतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. मात्र अनेकदा भक्तांना घाई असल्याने ते सशुल्क पास घेऊन दर्शन घेतात. अनेक वर्षांपासून सशुल्क पास दर्शनाला दोनशे रुपये प्रति व्यक्ती अशा पद्धतीने पास दिला जातो. मात्र  आता हा शुल्क पास दोनशे रुपये ठेवण्यात आला असून व्हीआयपीसाठी हाच पास आता शंभर रुपयांनी महागला आहे. हा पास घेतल्यानंतर भक्ताला प्रोटोकॉल देत दर्शन दिला जाणार आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सशुल्क पास दर्शन सेवा सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी साईबाबा संस्थानच्या वतीने ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू केली गेली. VIP V  शिफारस पत्र असलेल्या भक्तांना ब्रेक दर्शन व्यवस्थेत सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या वेळेत प्रति व्यक्ती 200 रुपयांना सशुल्क पास घेऊन दर्शन दिलं जातं.

 व्हीआयपी आणि शिफारस पत्र असलेल्या साईभक्तांना ही सुविधा मिळते. आता याच पास साठी व्हीआयपी भक्तांना आता 200 ऐवजी 300 रुपये मोजावे लागणार आहे. निर्धारित वेळेतच या साई भक्तांना दर्शन मिळणार असून एकत्रित पद्धतीने सर्वांना दर्शन दिले जाणार आहे. मात्र घाई असलेल्या सामान्य भक्तांच्या सशुल्क पास दरामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number