Friday, March 13, 2026 11:13:01 PM

Vishal-Akshay wedding : ना हॉलची चमक, ना भव्य मैदान; जिथे शिव-पार्वतींचा विवाह झाला, त्याच पवित्र स्थळी विशाल-अक्षयाने पार पाडला मंगलमय सोहळा

स्टार प्रवाहवर सुरु असलेल्या 'वेड लागलं प्रेमाचं' मालिकेतील अभिनेता विशाल निकम याने अभिनेत्री अक्षया हिंदळकर सोबत त्याच्या वाढदिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी विवाह पार पाडला आहे.

vishal-akshay wedding  ना हॉलची चमक ना भव्य मैदान जिथे शिव-पार्वतींचा विवाह झाला त्याच पवित्र स्थळी विशाल-अक्षयाने पार पाडला मंगलमय सोहळा

स्टार प्रवाहवर सुरु असलेल्या 'वेड लागलं प्रेमाचं' मालिकेतील अभिनेता विशाल निकम याने अभिनेत्री अक्षया हिंदळकर सोबत त्याच्या वाढदिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी विवाह पार पाडला आहे. यावेळी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. विशालच्या रोमँटिक पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओसह विशालनं पोस्टमध्ये लिहिलंय, "चंद्रभागेसारखं प्रेम आपलं सखी, मी तुझ्यात सामावून जाईन, रुसली जरी तू रखुमाई सारखी, मी सावळा विठ्ठल होऊन जाईन, कायम तुझा रुसवा काढून, तुला आयुष्यभर मनवत राहीन." विशाल आणि अक्षया यांच्या लग्नाचा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'साता जन्माच्या गाठी' या स्टार प्रवाह वरील मालिकेत विशाल निकम आणि अक्षय हिंदळकर या दोघांनी एकत्र काम केलं होतं. या मालिकेवेळीच दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाल्याचं चाहत्यांकडून म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- Divya Shinde Big Boss Marathi : बिग बॉस मराठी विरोधात उच्च न्यायालयात याचिका, दिव्या शिंदेचा बिग बॉसवर आरोप
दरम्यान विशाल आणि अक्षया या दोघांनी ही त्यांचचा विवाह कोणत्याही आलिशान हॉल किंवा मोठ्या मैदानी जागेवर पार न पाडता मुंबई-पुण्यापासून लांब जाऊन उरकला आहे. त्यांनी उत्तराखंडमधील प्रसिद्ध त्रियुगीनारायण मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. गंगा घाट परिसरातील हे मंदिर निसर्गरम्य हिमालयीन वातावरणात वसलेले आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील त्रियुगीनारायण मंदिर हे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहस्थळासाठी प्रसिद्ध असलेले अत्यंत पवित्र प्राचीन मंदिर आहे, अशी मान्यता आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे त्रेतायुगापासून तेवत असलेली अखंड अग्नी, जिच्या साक्षीने शिवा-पार्वतीचा विवाह झाला होता, तसेच हे मंदिर केदारनाथच्या धर्तीवर वास्तुकला असलेले एक महत्त्वाचे विवाह ठिकाण आहे. हे मंदिर हिंदू धर्मात शाश्वत वैवाहिक जीवनाचं पवित्र स्थळ मानलं जातं. त्यामुळे अनेक जोडपी येथे विवाह करण्यास प्राधान्य देतात. याठिकाणी दोघांनी साधेपणा आणि परंपरा जपत दोघांनी मंदिराबाहेर पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. लग्नात अक्षयाने ऑरेंज रंगाचा सुंदर घागरा परिधान करत त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज केला होता. तर विशालने हिरव्या रंगाची धोती आणि व्हाइट उपरण परिधान केलं होतं. तसेच विशालने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

 


सम्बन्धित सामग्री