Monday, May 11, 2026 11:33:38 AM

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी आज मतदान, मस्साजोगकडे विशेष लक्ष; संतोष देशमुखांच्या पत्नीची सरपंचपदासाठी लढत

santosh deshmukh case  बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी आज मतदान मस्साजोगकडे विशेष लक्ष संतोष देशमुखांच्या पत्नीची सरपंचपदासाठी लढत

मस्साजोग : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या मसाजोग येथे सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, मंगळवारी प्रत्यक्ष मतदान होत आहे. मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि गावातीलच स्वरूपानंद देशमुख यांच्यात 'काट्याची लढत' होत आहे. या संवेदनशील पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात 12 थेट सरपंच पदे आणि 19 सदस्य पदे अशा एकूण 31 रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. यासाठी 59 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून 29 इमारतींमध्ये मतदानाची सोय केली आहे. एकूण 37 हजार 866 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्यामध्ये 19 हजार 867 पुरुष आणि 17 हजार 299 महिला मतदारांचा समावेश आहे.

हेही वाचा : Vidhan Parishad Election 2026: अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस, उद्धव ठाकरे काही तयार होईनात; आता कसं असेल महायुतीचं गणित?

दरम्यान, दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि मस्साजोगमधील सरपंचपदाच्या उमेदवार अश्विनी देशमुख यांनी मतदानादिवशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, लोकांचा कौल चांगल्या पद्धतीने मिळेल असा विश्वास आहे. आण्णा असताना एवढा संघर्ष आम्हाला करावा लागला नाही. आज त्यांची उणीव भासत आहे. आम्ही अण्णांचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. आरोपांना मतदार उत्तर देतील. काहीही झालं तरी सहकार्य करुन आम्ही सर्वांच्या सोबतच राहणार आहोत. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या