Saturday, February 14, 2026 03:21:02 AM

Municipal Corporation Election 2026 : राज्यात आज मतदानाचा महासंग्राम! 29 महापालिकांसाठी आज मतदान; उमेदवारांची संख्या थक्क करणारी

आज राज्यभरात बृहन्मुंबई महानगरपालिकांसह 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान राज्यभरात राज्यातील जनता आज मतदानाची भूमिका बजावणार आहे.

municipal corporation election 2026  राज्यात आज मतदानाचा महासंग्राम 29 महापालिकांसाठी आज मतदान उमेदवारांची संख्या थक्क करणारी

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर आज राज्यभरात बृहन्मुंबई महानगरपालिकांसह 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान राज्यभरात 15 हजार 931 उमेदवारांसह एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदारांची नोंद झाली असून, राज्यातील जनता आज मतदानाची भूमिका बजावणार आहे. यावेळी राज्यातील एकूण 893 प्रभागांसाठी तब्बल 15,931 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसह पक्षानुसार भाजप आणि दोन्ही शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निवडणूक प्राणप्रतिष्ठेची असणार आहे. 


राज्यभरात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदारांची नोंदणी झाली असून, निवडणूक रिंगणात एकूण १५ हजार ९३१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि दोन्ही शिवसेनांसह, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या