Wardha Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात घडला अनर्थ; तीन वाहनांचा भीषण अपघात, दोन जणांचा दुर्दैवी अंत

वर्धा-आर्वी मार्गावर तळेगाव शिवारात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. आयशर वाहन, डंपर आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे

Wardha Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात घडला अनर्थ; तीन वाहनांचा भीषण अपघात, दोन जणांचा दुर्दैवी अंत

वर्धा : वर्धा-आर्वी मार्गावर तळेगाव शिवारात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. आयशर वाहन, डंपर आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर वाहन आणि दोन ट्रॅक्टर आर्वीच्या दिशेने जात होते, तर डंपर वर्ध्याच्या दिशेने येत होता. दरम्यान तळेगाव शिवारात आयशर वाहन चालक हा ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. याच  वेळी समोरुन येणाऱ्या डंपरसोबत वाहनांची धडक झाली. या अपघाताची धडक इतकी जोरदार होती की वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

हेही वाचा-Buldhana : जाळ्यात अडकला, पण एका चुकीने क्षणात निसटला; बिबट्याचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार; पाहा VIDEO

या घटनेची माहिची मिळताच खरांगणा(मोरांगणा) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदतकार्य सुरु केले. तर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर अडकल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला होता. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number