Thursday, March 12, 2026 09:52:45 PM

Weather Alert : राज्यात येत आहे दुहेरी संकट! IMD कडून पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी

महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत आहे ज्यामुळे हवामानात वेगवेगळ्या बदलांचा अनुभव घेतला जात आहे. राज्यातील लोकांना सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णतेचा सामना करावा लागतो आहे.

weather alert  राज्यात येत आहे दुहेरी संकट imd कडून पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी

महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत आहे ज्यामुळे हवामानात वेगवेगळ्या बदलांचा अनुभव घेतला जात आहे. राज्यातील लोकांना सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णतेचा सामना करावा लागतो आहे. आज राज्यातील काही भागात येत्या दोन दिवसात किमान तापमानात 2-3 अंशांची घट होऊन थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आज मुंबईतील हवामान प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला शिवकृपा हवी? 'या' वेळेत करा जलाभिषेक, जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज मुंबईत कमाल तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे, तर  किमान तापमान 22 अंश सेल्सिअस ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आज दिवसभर हवेत आर्द्रता कायम राहू शकते, आणि पावसाची शक्यता शून्य आहे. तर ठाण्यात काहीसा गारवा जाणवेल. हवामान कोरडे राहणार असून किमान तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर हवामान प्रामुख्याने उष्ण आणि दमट असून, कमाल तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आज कोकणात उकाडा जाणवेल. कल्याण-डोंबिवलीतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा- Vegetable Storage Tips: आठवड्याभरात भाजी खराब होते? ‘या’ 5 ट्रिक्स वापरा आणि भाजी ठेवा 2 आठवडे टवटवीत

पुण्यात दिवसभर तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, परंतु आर्द्रता आणि वाऱ्याच्या परिस्थितीमुळे ते 27 अंश सेल्सिअस सारखे वाटू शकते. तसेच नागपूरमध्ये आज हवामान धुक्याचे राहण्याची शक्यता आहे, कमाल तापमान 30.9 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17.2 अंश सेल्सिअस राहील. आज नाशिकमध्ये वारा पूर्वेकडून मंद गतीने वाहत आहे. हवामान स्वच्छ आणि कोरडे असून, हवेची आर्द्रता सुमारे 60 टक्के इतकी आहे. तर नाशिकमध्ये किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. दिवसभर निरभ्र आकाश असेल ज्यामुळे पावसाची शक्यता नाही.


सम्बन्धित सामग्री