Weather Alert: राज्यावर दुहेरी संकट! पुढील 24 तासांत जाणवणार ‘हे’ बदल; हवामान खात्याचा अंदाज काय?

उष्णतेच्या लाटेनंतर आता अवकाळी पावसाने महाराष्ट्राला विळखा घातला आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे.

Weather Alert: राज्यावर दुहेरी संकट! पुढील 24 तासांत जाणवणार ‘हे’ बदल; हवामान खात्याचा अंदाज काय?

उष्णतेच्या लाटेनंतर आता अवकाळी पावसाने महाराष्ट्राला विळखा घातला आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने 25 मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडणे हिताचे ठरेल. 

कोकणपट्ट्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान असून कमाल तापमान 33-36 अंश सेल्सिअस तर किमान 24-27 अंश इतके राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये 33-35 अंश तापमान राहणार असून प्रादेशिक हवामान केंद्राने नागरिकांना विजा पडण्याच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा- Mobile Recharge New Rules: मोबाईल रिचार्जचा '28 दिवसांचा' फंडा संपणार; सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश; आता पूर्ण महिनाभर मिळणार…

पश्चिम महाराष्ट्रात दुहेरी फटका बसणार आहे. सातारा आणि कोल्हापूरमध्ये कोरडे वातावरण असून दुसरीकडे सांगली आणि पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंशसह ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तावला जात आहे. तसेच सोलापूरात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळे तापमानात घट होऊन दिलासा मिळाला असला, तरी शेतीसाठी हे वातावरण घातक ठरणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 33-37 अंश तर किमान 20-23 अंश आहे, तसेच परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचसोबत विदर्भात कमाल तापमान 34-38 अंश तर किमान 21-24 अंश राहणार असून नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणामध्ये उष्णता कायम असेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वाढलेली आर्द्रता आणि उन्हाचा तडाखा यामुळे उकाडा देखील तीव्र जाणवणार आहे. अचानक वातावरणात झालेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या मनात पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number