Weather Alert: राज्यात हवामानाचा विचित्र खेळ! कुठं गारवा आणि दाट धुकं, तर कुठं उन्हाच्या तीव्र झळा

राज्यातील काही भागात उष्णतेची लाट कायम असून बहुतांश जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तावण्यात आली आहे.

Weather Alert: राज्यात हवामानाचा विचित्र खेळ! कुठं गारवा आणि दाट धुकं, तर कुठं उन्हाच्या तीव्र झळा

राज्यातील काही भागात उष्णतेची लाट कायम असून बहुतांश जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तावण्यात आली आहे. नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये कमाल तापमान 36-39 अंश तर किमान 23-27 अंश सेल्सिअसपर्यंत असून हवामान खात्याने या उत्तर कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकणच्या किनारपट्टीवर सध्या सूर्याचा कोप पाहायला मिळतोय. रत्नागिरीत उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले असून, तापमानाचा पारा चक्क 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असून,वाढत्या उष्म्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. सकाळी हवेत गारवा आणि दाट धुकं, तर दुपार होताच आग ओकणारा सूर्य, अशा दुहेरी हवामानाचा फटका रत्नागिरीकरांना बसतो

हेही वाचा- Iran Israel US War: थेट युद्धभूमीतून मोठी बातमी; 60 वर्षांचा वारसा असलेले अमेरिकेचे KC-135 विमान इराकमध्ये कोसळले, शत्रूची चाल की अपघात?
दरम्यान पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीममध्ये उष्णतेचा तडाखा बसणार असून नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही तापमान 40 अंशांच्या आसपास तर उत्तर-पश्चिम वाऱ्यामुळे तापमानात वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. विदर्भात अमरावती, वर्धा आणि अकोला जिल्ह्यांसाठी विशेष हिट-वे अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावचा पारा चाळीशी पार गेला आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये मार्च महिन्यातच पारा 38 अंशावर गेल्याने यंदा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तावली जात आहे. नाशिकचा तापमान मार्च महिन्यातच 38 अंशावर असून उन्हाळा सुरू होताच उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक देखील हैराण झाल्याचे पाहायला मिळत असले तरी दुपारच्या सुमारास काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तर, एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना डॉक्टरांनी देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number