Weather Update : राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळणार; कोकणासह इतर भागात काय स्थिती?

मुंबईसह कोकणात पावसाचा अलर्ट जारी केलेला असताना उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र उष्णतेचा प्रहार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे.

Weather Update : राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळणार; कोकणासह इतर भागात काय स्थिती?

राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसामुळे हवामानात थंडावा जाणून लागला आहे. उकाड्याने हैराण नागरिकांना अखेर दिलासा मिळतोय असं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईसह कोकणात पावसाचा अलर्ट जारी केलेला असताना उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र उष्णतेचा प्रहार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे. यावेळी मुंबईसह कोकणात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यादरम्यान ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तावली आहे.

सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. आज पहाटेपासून पावसाने समुद्रकिनारी भागात विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने एक तास धुवाधार बॅटिंग केली असून शेवटच्या हंगामात असलेल्या आंबा उत्पादनावर या अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसला आहे. जोरदार वारा व विजेच्या कडकडाटामुळे जिल्ह्यात काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच सध्या सिंधुदुर्गात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. 

त्याचसोबत पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि ठाणे यांना जोडणाऱ्या नानेघाटात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. जून महिन्यापूर्वीच या भागात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत असून, संपूर्ण घाट परिसर पांढऱ्याशुभ्र धुक्याच्या चादरीत वेढला गेला आहे. कडक उन्हाच्या चटक्यानंतर आता निसर्गाने कात टाकली असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे.

हेही वाचा- CNG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा फटका! CNG च्या दरात 10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढ; जाणून घ्या ताजे दर

मराठवाड्यात देखील पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. यावेळी बीडच्या केज तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या वादळी पावसामुळे युसुफ वडगाव, सादोळा,  भालगाव या परिसरात अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत याबरोबरच अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष देखील उन्मळून पडले आहेत.

काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने तसेच तारा तुटल्याने वीजपुरवठा देखील विस्कळीत झाला होता. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या आंब्याचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे हिंगोलीच्या वसमत शहरासह परिसराला शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाचा सर्वाधिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. 

या उलट विदर्भात मात्र अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. यावेळी ठाणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे. तर विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट, 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर आणखी 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number